मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ च्या सत्राला सुरुवात झाली आहे. आज सत्राच्या दुसऱ्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चैन्नई सुपर किंग समोर आव्हान असेल ते युवा रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा संघाचे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आयपीएल २०२० चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाची नेतृत्वाची जबाबदारी युवा यष्टिरक्षक रिषभ पंतवर आली आहे.एकीकडे दिल्लीचा संघ... Continue Reading →
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पहिल्याच सामन्यांत गतविजेते मुंबई इंडियन्सवर २ गडी राखुन विजय, हर्षल पटेल ठरला सामनावीर
आयपीएल २०२० नंतर काही महिन्यांतच आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या मधील सामन्यांने होत होता. बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.काईल जेमिसन, ख्रिस लीन व मार्को जेनेसन आपल्या संघासाठी पहिला वहिला सामना खेळत होता. एकीकडे मुंबईचा संघ दोन फिरकी गोलंदाजांसह... Continue Reading →
आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचे आव्हान
करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त अरब अमिराती मध्ये खेळविण्यात आलेल्या आयपीएल २०२० नंतर आज चैन्नई मध्ये मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ चा बिगुल वाजणार आहे. करोना विषाणु मुळे यावेळेस स्पर्धा मर्यादित ठिकाणी खेळविण्यात येत आहे त्यात मुंबई, चेन्नई, बेंगलोर, कोलकत्ता, दिल्ली व अहमदाबादचा समावेश आहे तर प्ले ऑफचे सामने अहमदाबाद मधील भव्य... Continue Reading →
मुंबई इंडियन्स
२०१९ च्या सत्रात आपले चौथे आपपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियनंसचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता.महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल २०२० चे सत्र संयुक्त अरब अमिरात मध्ये खेळविण्यात येत होती आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये मुंबई संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे त्यामुळे मुंबईचा संघ संयुक्त अरब अमिरात मधील आपली कामगिरी सुधारण्यास उत्सुक होता. पहिल्या सामन्यांत... Continue Reading →
दिल्ली कॅपिटल्स
२०१९ आणि २०२० सलग दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपदापर्यंत पोहचला होता पण २०२० च्या सत्रात मुंबई इंडियन्सकडुन पराभव स्विकारावा लागल्याने दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दिल्लीने सत्राची सुरुवात धडाक्यात करत पहिल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत दिल्लीने आपले प्ले ऑफचे तिकीट पक्के केले असेच दिसत होते पण... Continue Reading →
सनरायझर्स हैद्राबाद
२०१६ ते २०१९ दरम्यान चारही सत्रात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ एकमेव संघ होता आणि कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता. बेंगलोर व कोलकत्ता संघाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर दोन सलग विजय मिळवत हैद्राबादचा संघ आपल्या नेहमीच्या लयीत आला असे वाटत होते पण पुढील ७ सामन्यांत त्यांना फक्ता... Continue Reading →
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
आपले पहिले-वहिले विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता आणि बेंगलोर संघाने सनरायझर्सविरुद्ध विजय मिळवत त्यांनी तशी सुरुवात देखिल त्यांनी केली होती. बेंगलोरच्या संघाने कामगिरीत सातत्य राखत पहिल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत बेंगलोरचा संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता आणि बेंगलोरचा संघ... Continue Reading →
कोलकत्ता नाईट रायडर्स
२०१२ व २०१४ च्या सत्राचा विजेता राहिलेल्या कोलकत्ता संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिकच्या खांद्यावर होते. २०२० च्या सत्रात मुंबईविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर कोलकत्ता संघाने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध शानदार विजय मिळवत सत्रातला पहिला विजय मिळवला होता.पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवत कोलकत्ताने चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि सत्राच्या मध्यात... Continue Reading →
पंजाब किंग्स
१३ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पंजाब संघाने आतापर्यंत फक्त २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.२०२० च्या सत्रात के एल राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता तर दुसरीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली होती.पहिल्याच सामन्यांत सुपर ओव्हर मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९७ धावांनी विजय... Continue Reading →
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरले
२ एप्रिल २०११, तब्बल १५ वर्षांनंतर भारतीय उपखंडात विश्वचषक खेळवण्यात येत होता. १९८७ व १९९६ मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकापूर्वी एक- दीड वर्षातील भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघाकडे विजेतेपदाचा प्रमुख दावेदर म्हणून पाहिले जात होते त्यात भारतीय संघ मायदेशात खेळणार होता त्यामुळे संघाला प्रेक्षाकांचीही मोठ्या प्रमाणात मदत होणार... Continue Reading →
चेन्नई सुपर किंग्स
तीन वेळेस विजेतेपद आणि ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चैन्नईचा आपले चौथे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आयपीएल २०२० च्या आयपीएल मध्ये दाखला झाला होता आणि २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चैन्नई संघाने सुरुवात केली होती.सुरेश रैना व हरभजन सिंगने काही कारणास्तव आयपीएलमधुन माघार घेतली होती त्यामुळे चैन्नईचा संघ काहीसा कमजोर वाटत होता.विजयी सुरुवातीनंतर तीन वेळच्या... Continue Reading →
राजस्थान रॉयल्स
आयपीएल २००८ चा विजेता राहिलेला राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्या सत्रात प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरला होता.२०२० च्या सत्रात स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानच्या संघाने सत्राच्या पहिल्या दोन सामन्यांत चैन्नई सुपर किंग व किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध शानदार विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने सत्राची धडाक्यात सुरुवात केली होती.पण त्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे राजस्थानला सलग ४ पराभवाला... Continue Reading →
युवा रिषभ पंतच्या गळ्यात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यांत क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला ९ एप्रिल पासुन सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ मधुन माघार घ्यावी लागली.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने मागील दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला होता त्यातील २०२० च्या युएई मध्ये झालेल्या आयपीएल मध्ये दिल्लीने अंतिम फेरी पर्यंत मजल मारली होती पण त्यांना मुंबई... Continue Reading →
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोणाच्या गळ्यात पडणार दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ?
आयपीएल २०२० सत्राचा उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२१ सत्रापुर्वीच मोठा धक्का बसला आहे.आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ९ एप्रिलला होणार आहे पण भारत-इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यामुळे अय्यरच्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे.हा दिल्ली संघासाठी मोठा धक्का आहे आता या सत्रात... Continue Reading →
अटीतटीच्या सामन्यांत भारताची इंग्लंडवर ७ धावांनी मात, भारताचा एकदिवसीय मालिकेवर २-१ ने कब्जा
मालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आहे त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक होता.मागच्या सामन्यांत ३३६ धावा करुन देखिल भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते तर दुसरीकडे ३३७ धावांचे आव्हान ४४ व्या षटकांतच पार केल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढला होता.सलग तीसऱ्या सामन्यांत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारतीय... Continue Reading →
कोण ठरणार एकदिवसीय मालिकेचा विजेता?
भारतीय संघाने पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवला होता पण दुसऱ्या सामन्यांत जॉनी बेअरस्टो (१२४) व बेन स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने ६ गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे.त्यामुळे रविवारी होणाऱ्या मालिकेतल्या तीसऱ्या आणि शेवटच्या सामन्यांत विजय मिळवून मालिका आपल्या नावे करण्यास दोन्ही उत्सुक असतील.पहिल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडने नाणेफेक जिकंत गोलंदाजाचा निर्णय घेतला... Continue Reading →
बेअरस्टो व स्टोक्सच्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडचा ६ गड्यांनी विजय, मालिकेत साधली १-१ ने बरोबरी
पहिल्या सामन्यांत ६६ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती त्यामुळे दुसऱ्या सामन्यांत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला होता.तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मालिकेत टिकुन राहण्यासाठी विजय आवश्यक होता.दुखापतग्रस्त इयॉन मॉर्गनच्या जागी यष्टिरक्षक जोस बटलरवर इंग्लंड संघाच्या कर्णधार पदाची जिम्मेदारी आली होती.कर्णधार बटलरने नाणेफेक जिंकत... Continue Reading →
बेअरस्टो व जेसन रॉयच्या फटकेबाजीनंतर इंग्लंडचे भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण, भारताची मालिकेत १-० ने आघाडी
कसोटी मालिकेनंतर टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याच आत्मविश्वासाने भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरला होता. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडुन अष्टपैलु कृणाल पंड्या व जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णा आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळत होते. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्याने भारताला सलामीवीरांकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा... Continue Reading →
विश्वविजेता इंग्लंड संघावर भारी पडणार का विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ?
कसोटी मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कसोटी आणि टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे यात काही शंका नाही.त्याच आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरेल हे मात्र नक्की. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे (गहुंजे) येथे २३ ते २८ मार्च दरम्यान... Continue Reading →
दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५५५, रुटचे शानदार द्विशतक
भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट रसिकांचे लक्ष्य लागलेल्या भारत वि. इंग्लंड मालिकेला काल चैन्नईमध्ये सुरुवात झाली आहे.पहिल्या दिवशी ३ बाद २६३ इंग्लंडसाठी शानदार सुरुवात होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुट १२८ धावांवर नाबाद होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला मोठ्या धावसंख्येपासुन रोखण्यासाठी भारताला दुसऱ्या दिवशी झटपट गडी बाद करण्याची आवश्यकता होती.दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात रुट व स्टोक्सने... Continue Reading →
कोणता संघ करणार विजयाने सुरुवात?
५ फ्रेब्रुवारीपासून भारत व इंग्लंड दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नई मध्ये सुरुवात होत आहे. दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यातील मालिका रद्द झाल्यामुळे न्युझिलंडचा संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवणारा... Continue Reading →
कोणता संघ पहिल्या सामन्यांत वरचढ ठरेल?
एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघ बॉर्डर-गावसकर मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासुन ऍडलेड येथे सुरुवात होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्यापासुन सुरु होणारा पहिला सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार आहे.भारतीय संघ पहिल्यांदाच विदेशी भुमिवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे त्यामुळे भारतीय संघाचा कस लागणार... Continue Reading →
कोण घेणार मालिकेत आघाडी?
युएई मध्ये आयपीएल २०२० यशस्वीरित्या पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव स्विकारावा लागला आहे.एकदिवसीय मालिकेतील तीसऱ्या व शेवटच्या सामन्यांत १३ धावांनी विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही त्यामुळे टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ विजयाने करण्यास... Continue Reading →
भारतीय संघ व्हाईटवॉश रोखु शकेल का?
भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका जबरदस्त होईल असेच वाटत होते पण ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलियाने तिन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजयी आघाडी घेतल्याने यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ व्हाईटवॉश देण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे भारतीय संघ मालिकेतील शेवटच्या व तीसऱ्या सामन्यांत विजय मिळवून... Continue Reading →
बुमराह व बोल्टच्या शानदार गोलंदाजीनंतर इशानच्या नाबाद ७२ धावांच्या बळावर मुंबईचा दिल्लीवर ९ गड्यांनी विजय
सलग ३ सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर उभा ठाकला होता.मुंबई इंडियन्सने आपले प्ले ऑफ मधील स्थान पक्के केले होते पण दिल्लीचा संघ एका विजयासाठी झगडत आहे.मुंबईचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने हार्दिक पंड्याला विश्रांती दिली होती. हार्दिक व पॅटिन्सनच्या जागी जयंत यादव व कुल्टर... Continue Reading →
दिल्ली प्ले ऑफ मधील स्थान पक्के करणार की मुंबई आपले वर्चस्व कायम राखणार?
आयपीएल २०२० मधील ५० सामने झाल्यानंतरही आतापर्यंत मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे एकवेळ गुणतालीकेत अग्रस्थानी असलेला दिल्लीचा संघ प्ले ऑफ मध्ये सहज प्रवेश मिळवेल असे दिसत असताना दिल्लीला मागील ३ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे तसेच सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध ८८ धावांनी पराभव झाल्याने दिल्ली संघाचा नेट रनरेटवर चांगलाच परिणाम... Continue Reading →
दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२० च्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरणार का?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व सुपर ओव्हर मध्ये मुंबईवर विजय मिळवत पंजाबने सलग दोन विजय मिळवले आहेत तर दुसरीकडे गुणतालिकेत दिल्लीचा संघ अग्रस्थानी आहे. त्यामुळे सामना जबरदस्त होईल यात शंका नाही.दिल्लीने आपले प्ले ऑफ मधील स्थान जवळपास निश्चित केले आहे तर पंजाबचा संघ ६ गुणांसह ७ व्या स्थानी आहे त्यामुळे पंजाब संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.... Continue Reading →
कोण करणार विजयाने सुरुवात?
२०१९ च्या सत्रातील विजेता आणि उपविजेता मध्ये आयपीएल २०२० चा पहिला सामना अबुधाबी मध्ये रंगणार आहे.आयपीएल इतिहासातील दोन सर्वोत्कृष्ट संघातील सामन्यांने आयपीएल २०२० च्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे मार्च मध्ये सुरु होणारी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता संपुर्ण स्पर्धाच युएई मधील अबुधाबी,शारजा आणि दुबई मध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर... Continue Reading →
मुंबई इंडियन्स
२०१३,२०१५,२०१७ व २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद राखण्यास मैदानात उतरणार आहे.यावेळेस संपुर्ण स्पर्धा युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे पण २०१४ मध्ये युएई मध्ये स्पर्धेचे सुरुवातीचे काही सामने खेळवण्यात आले होते त्यात मुंबईने आपले पाचही सामने गमावले होते त्यामुळे युएईमधील आपली कामगिरी सुधारण्यासही मुंबईचा संघ उत्सुक असेल. आयपीएल इतिहासात... Continue Reading →
चेन्नई सुपर किंग्ज
२०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद तर तब्बल ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघ विजेतेपदांमध्ये मुंबई संघाची बरोबरी करण्यास उत्सुक असेल. युएई मध्ये झालेल्या २०१४ च्या सत्रात चेन्नईची शानदार कामगिरी केली होती.मागील दोन सत्रात अनुक्रमे विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघाच्या कामगिरीवर क्रिकेट रसिकांचे लक्ष्य असेल. आयपीएलचे १३ वे सत्र सुरु होणापुर्वीच सुरेश रैना व... Continue Reading →
दिल्ली कॅपिटल्स
२००८ व २००९ मध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतरही दिल्लीचा संघ मागील १२ वर्षांत अंतिम फेरी गाठु शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात २०१९ च्या सत्रात पहिल्या चार संघात प्रवेश मिळवला होता. पण दिल्लीला क्वालिफायर-२ मध्ये चेन्नई सुपरकिंग विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ आपले पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानेच मैदानात... Continue Reading →
सनरायझर्स हैद्राबाद
२०१६ च्या सत्रात विजेतेपद तर २०१८ च्या सत्रात उपविजेते पटकावलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंका नाही.तसेच मागील चार सत्रात पहिल्या चार क्रमांकामध्ये राहिलेला सनरायझर्स हैद्राबाद एकमेव संघ आहे त्यामुळे आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास संघ उत्सुक असेल यात काही शंका नाही. वॉर्नर,बेअरस्टो,नबी व राशिद खान सामने खेळुन आयपीएल मध्ये... Continue Reading →
कोलकत्ता नाईट रायडर्स
२०१२ व २०१४ मध्ये गोतम गंभीरच्या नेतृत्वात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. सुनिल नारायण, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, कुलदिप यादव आणि नितीश राणा यांसारख्या तगड्या खेळाडुंचा समावेश असलेल्या कोलकत्ता संघ आपले तिसरे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल यात शंका नाही.तसेच सीपीएल मध्ये ब्रॅंडन मॅक्युलमच्या प्रशिक्षणात त्रिनबागो... Continue Reading →
किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१९ च्या सत्रात रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.पण यावेळेस पंजाबचा संघ नवीन कर्णधार के एल राहुलच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच पंजाबने मुख्य प्रशिक्षक म्हणुन अनिल कुंबळेची नेमणुक केली आहे त्यामुळे राहुल व कुंबळेची जोडी कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ च्या... Continue Reading →
राजस्थान रॉयल्स
आयपीएलच्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवल्यानंतर राजस्थानला पुढील ११ वर्षांत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. शेन वॉर्न, राहुल द्रविड, शेन वॉटसन,स्टिव्ह स्मिथ व अजिंक्य रहाणे यांसारख्या तगड्या खेळाडुंनी राजस्थानचे नेतृत्व केले आहे पण अजुनही राजस्थानचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलेला नाही.अनुभवासोबतच नवख्या खेळाडुंची राजस्थान संघाने नेहमीच चांगल्याप्रकारे सांगड घातली आहे त्याचप्रमाणे... Continue Reading →
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
जागतिक क्रिकेटमधील तगड्या खेळाडुंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आजपर्यंत विजेतेपद पटकावता आले नाही. २००९,२०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोर संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा बेंगलोर संघ आपल्या पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल हे नक्की.२०१४ मध्ये युएईमध्ये झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांत बेंगलोरला फक्त २ सामने जिंकता आले... Continue Reading →
यजमान इंग्लंड मालिका खिशात घालणार की ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करेल?
मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यांत १६३ धावांचा पाठलाग करताना कर्णधार अॅरॉन फिंच व डेविड वॉर्नरने ११ षटकांत ९८ धावांची सलामी दिली होती.ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात मिळाली होती त्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज सामना जिंकेल असेच दिसत होते. फिंच बाद झाल्यानंतरही वॉर्नर मैदानात टिकुन होता आणि तो संघाला सहज सामना जिंकुन देईल असे वाटत होते. १ बाद १२४ वरुन ऑस्ट्रेलियाची... Continue Reading →
यजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्धचे मायदेशातील वर्चस्व कायम राखेल की ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील पहिल्या टी-२० मालिका विजयाकडे आगेकुच करेल?
पाकिस्तानविरुद्धची टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राहिल्यानंतर यजमान इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० व एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यातील टी-२० मालिकेला आजपासुन सुरुवात होत आहे. दोन्ही संघांचा विचार करता इंग्लंडने मागील दोन – अडीच महिन्यांत दोन कसोटी मालिका,एक एकदिवसीय मालिका व एक टी-२० मालिका खेळली आहे तर ऑस्ट्रेलिया मार्च मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे जवळपास... Continue Reading →
आयपीएल २०२० मधुन मलिंगाची माघार, मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिन्सनची वर्णी
१९ सप्टेंबर २०२० पासुन युएई मध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतेक सर्वंच खेळाडुंना सरावाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सर्वच संघ जोरदार सराव करत आहेत त्यातच ४ वेळेसचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. २००९ ते २०१९ पर्यंत मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे या सत्रातुन... Continue Reading →
पाकिस्तान मालिकेचा शेवट गोड करणार की इंग्लंड मालिका खिशात घालणार ?
पहिला सामन्यांत पावसामुळे फक्त १६.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यांत यजमान इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानची सलामी जोडी फखर जमान व कर्णधार बाबर आझमने संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. फखर व बाबरच्या भागिदारीनंतर अनुभवी मोहम्मद हफीजने ३६ चेंडूत ४ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने ६९ धावांची खेळी करत... Continue Reading →
इंग्लंडविरुद्धच्या टी२० व एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
वेस्ट इंडिज, आर्यलॅंड, पाकिस्तान पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-२० सामने अनुक्रमे ४,६ व ८ सप्टेंबरला ओल्ट ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर येथे तर एकदिवसीय सामने ११, १३ व १६ सप्टेंबरला एग्ज बॉउल,हॅम्पशेअर येथे खेळविण्यात येणार... Continue Reading →
पाकिस्तान बरोबरी साधणार की इंग्लंड घेणार मालिकेत विजयी आघाडी?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल चार महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ आर्यलॅंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला.त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मॅंचेस्टर येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांत यजमान इंग्लंडने तीन गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यांत नाणेफेक... Continue Reading →
स्टुअर्ट ब्रॉड ५०० नाबाद
स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजीचा कणा. स्टुअर्ट ब्रॉडचा जन्म १९८६ मध्ये नॉंटिंगहॅम मध्ये इंग्लंडचा फलंदाज ख्रिस ब्रॉडच्या घरात झाला होता. महत्त्वाचे म्हणजे स्टुअर्टच्या वडिलांनी देखील १९८४ ते १९८९ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ते सध्या सामनाधीकारीची भुमिका निभावत आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने २००५ मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती आणि... Continue Reading →
कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर
कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात. सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये... Continue Reading →
१९८३ विश्वचषक अंतिम सामना: एक ऐतिहासिक विजय
१९७५ व १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या दोन विश्वचषकात भारतीय संघाला नवोदित ईस्ट आफ्रिका संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला होता. पहिल्या दोन्ही विश्वचषकावर क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले नाव कोरले होते महत्त्वाचे म्हणजे सलग तीसरी विश्वचषक स्पर्धाही इंग्लंडमध्येच खेळविण्यात येत होती. सलग तिसरे विश्वविजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने वेस्ट इंडिजचा संघ तर भारतीय... Continue Reading →
कपिल देवची नाबाद १७५ धावांची ऐतिहासीक खेळी
१८ जून १९८३ म्हणजे तब्बल ३७ वर्षापुर्वी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार कपिल देवने डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडूत नाबाद १७५ दैदिप्यमान खेळी केली होती. १९७५ व १९७९ या पहिल्या दोन विश्वचषकात निराशाजनक कामगिरी राहिलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव करत केली होती. वेस्ट... Continue Reading →
भारतीय संघ जर एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने खेळत असेल तर भारताचे कसोटी व टी-२० संघ कसे असतील?
वर्षातले १२ महिने जगातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात क्रिकेट स्पर्धा सुरुच असतात आणि असा कोणताही महिना नसतो ज्यात एकही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मागिल तीन महिन्यांपासुन कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली गेली नाही. मागील महिन्यांत वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन टी-१० स्पर्धा खेळविण्यात आली तर आजपासुन ऑस्ट्रेलियाच्या डार्विन मध्ये टी-२० स्पर्धा खेळविण्यात... Continue Reading →
इंग्लंडचा संघ जर एकाच दिवशी टी-२० व कसोटी सामना खेळत असेल तर संघ कसे असतील?
कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धांवर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळण्याची शक्यता असु शकते पण हे असे होईलच असे नाही पण असे झाले तर त्यांचे संघ कसे असतील. समजा इंग्लंडचा संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतो तर दुसरीकडे... Continue Reading →
६ ते ८ जून दरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवली जाणार ऑस्ट्रेलियात टी-२० स्पर्धा
जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत काही देशातील फुटबॉल सामने व कॅरेबियन मधील टी-१० स्पर्धा सोडल्यास कोणतीही मोठी स्पर्धा खेळविण्यात आली नव्हती. त्यातच आता ह्या आठवड्याच्या शेवटी महाराणीच्या वाढदिवसानिमित्त डार्विन येथे टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट हळुहळु पुर्वपदावर येण्यास मदत होईल हे मात्र नक्की. Cricket will resume in the Northern Territory this weekend!... Continue Reading →
जिम लेकर
गोलंदाजीचे सर्वोत्कृष्ट पुथ:करण