गटातील पहिल्या सामन्यांत हॉंग कॉंग विरुद्धच्या सामन्यात हॉंग कॉंगच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा अंत पाहिला पण शेवटी चहल, पहिलाच सामना खेळणारा खलिल अहमद व कुलदिप यादवने भारताला पराभुत होण्यापासुन वाचवले आणि भारताने २६ धावांनी विजय प्राप्त केला. त्यानंतर भारताने प\n\nरंपरागत प्रतिस्पर्धि पाकिस्तानविरुद्ध दोनदा तर बांग्लादेशविरुद्ध एकतर्फी विजय प्राप्त केले. अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यापुर्वीच भारतीय संघ अंतिम सामन्यांत पोहचल्याने भारताने कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व जसप्रित बुमराहला विश्रांती देत खलिल अहमद, केल राहुल, मनिष पांडे व सिद्धार्थ कौल ला संधी दिली होती पण सामना अनिर्णित राहिला.
तर दुसऱ्या बाजुला बांग्लादेशने आशिया चषकाची सुरुवात धडाक्यात करत श्रीलंकेचा धुव्वा उडवला पण त्यानंतर अफगानिस्तानने बांग्लादेशचा धुव्वा उडवत धडाक्यात अंतिम चार मध्ये प्रवेश मिळवला आणि गटात प्रथम स्थान पटकावले तर बांग्लादेशला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम चार मधील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर बांग्लादेशने एका अतितटीच्या सामन्यात अफगानिस्तानचा पराभव केला. त्यानंतर बांग्लादेश व पाकिस्तानच्या सामन्याला उपांत्य सामन्याचे रुप आले होते. सामन्यांत विजय प्राप्त करणारा संघ भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार होता त्यात बांग्लादेशने बाजी मारत पाकिस्तानचा ३७ धावांनी पराभव करत आशिया चषकाच्या इतिहासात तीसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली. यापुर्वी २०१२ आणि २०१६ मध्ये बांग्लादेशने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यांत प्रवेश केला होता पण त्यांना अनुक्रमे पाकिस्तान व भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारताच्या कामगिरीत कर्णधार रोहित शर्मा (२६९ धावा), शिखर धवन (३२३ धावा), जसप्रित बुमराह (७ बळी), रविंद्र जडेजा (७ बळी) व कुलदिप यादवने (७ बळी) तर बांग्लादेशसाठी मुशफिकर रहिम (२९७ धावा), मोहम्मद मिथुन ( १३५ धावा), महमदुल्लाह (१५२ धावा), मुस्तफिजुर रहेमान (८ बळी) व शकिब अल हसनने ( ७ बळी) महत्त्वाची भुमिका बजावली. शकिब अल हसन दुखापतग्रस्त झाल्याने तो अंतिम सामन्यांत खेळणार नाही त्यामुळे त्याची उणिव बांग्लादेश संघाला भासेल यात शंका नाही पण जर बांग्लादेशला भारतीय संघासमाोर आव्हान उभे करायची जिम्मेदारी अनुभवी खेळाडु मुशफिकर रहिम, महमदुल्लाह व कर्णधार मशरफे मोर्तझावर असेल. सध्याचा रोहित शर्मा व शिखर धवनची कामगिरी पाहता ते बांग्लादेशच्या गोलंदाजांचा सामना करु शकतील पण तरी ही मधल्या फळीतील फलंदाजांना अंतिम सामन्यांतील दबावात खेळण्यास तयार राहावे लागेल. तर भुवनेश्वर कुमार व जसप्रित बुमराह वर बांग्लादेशच्या फलंदाजीला सुरुवातीला खिंडार पाडुन फलंदाजांना दबावात आणण्याची असेल. मागील काही सामन्यापासुन फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे त्यामुळे मधल्या षटकांत भारताची फिरकी तिकडी बाग्लादेशच्या फलंजांना सळो की पळो करु शकते.
आशिया चषकाच्या इतिहासात भारत आणि बांग्लादेशचा ११ वेळेस सामना झाला आहे त्यात भारताने १० वेळेस तर बांग्लादेशने एकमेव विजय २०१२ च्या आशिया चषकात मिळवला होता. मोठ्या स्पर्धेत आणि ते ही अंतिम सामन्यांचा अनुभव पाहता भारतीय संघाचे पारडे जड असेल यात शंका नाही. बाग्लादेशवर विजय मिळवुन भारतीय संघ ७ व्यांदा आशिय चषक आपल्या नावे करतो की बांग्लादेश पहिल्या आशिया चषकला गवसणी घालतो का हे पहावे लागेल.
Leave a Reply