दक्षिण आफ्रिका व इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमालिकेत झालेल्या पराभवला विसरून भारताला या मालिकेकडे लक्ष्य केंद्रित करावे लागेल. या दोन्ही मालिकेत भारताच्या सलामीविरांकडुन हवी तशी भागीदारी झाली नाही हेच भारताच्या पराभवच महत्वाचं कारण ठरलं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतकी खेळी करून के एल राहुलने आपले संघातील स्थान कायम राखली तर खराब कामगिरीमुळे मुरली विजय आणि शिखर धवनला स्थान गमवावे लागले. त्यांच्या जागी पृथ्वी शॉ व मयांक अगरवालची वर्णी लागली आहे. गोलंदाजीचा विचार करता त्यांची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व इशांत शर्माला विश्रांती दिली तर त्यांच्या जागी उमेश यादव, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुरला संधी मिळाली.
भारताच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेला आज पासून सुरुवात होत आहे. या मालिकेत २ कसोटींचा समावेश आहे. त्यानंतर एकदिवसीय व टी-२० मालिकाही खेळविण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून परदेशी संघांना भारतात कसोटी मालिका जिंकण्यात अपयशच आले आहे त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व न्युझिलंड यांसारख्या तगड्या संघांचा समावेश आहे. २०१२ मध्ये इंग्लंडने भारतीय संघाचा २-१ ने पराभव करत मालिका खिशात घातली होती पण त्यानंतर कोणत्याही संघाला मालिका तर सोडाच पण सामना जिंकणें हि अवघड झाले आहे. मायदेशातील मालिका विजयात फिरकी गोलंदाजांची कामगिरी वाखाण्याजोगी आहे. या फिरकी समोर स्मिथ, रुट, विल्यमसन व कुक सारखे तगडे खेळाडु अपयशी ठरले त्यामुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा कस लागणार यात शंका नाही.
पहिल्या सामन्यात भारतीय संघ पृथ्वी शॉला पदार्पणाची संधी देऊ शकते तर मयांक अगरवाला अजुन वाट पाहावी लागेल असेट वाटते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थित भारतीय संघ ५ गोलंदाजांसह उतरतो की नाही हे पाहावे लागेल. जर भारतीय संघ ५ गोलंदाजांसह उतरला तर मग हनुमा विहारीला सुद्धा बाहेर बसावे लागेल. भारतीय संघाची जिम्मेदारी ही फलंदाज व फिरकी गोलंदाजांवर असेल. अजिंक्य रहाणेनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एक-दोन खेळ्या केल्या पण विजय हजारे करंडकातील त्याची कामगिरी पाहता त्याचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती तो या मालिकेत करेल अशी आशा आहे तसेच रुषभ पंत पहिल्यांदा मायदेशात कसोटी खेळणार आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा विचार करता संघाची जिम्मेदारी कर्णधार होल्डर, अष्टपैलु चेस, होप, डाऊरिच, रोच, बार्थवेट व बिशुवर असेल पण पहिल्या सामन्याआधीच वेस्ट इंडिजला एक धक्का बसला की अनुभवी खेळाडु रोच काही वैयक्तिक करणांसाठी पहिल्या सामन्यांत खेळणार नाही त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. भारतातील मागील मालिकांचा विचार करता नेहमीच फिरकी गोलंदाजांचा बोल-बाला राहिला आहे त्यामुळे देवेंद्र बिशु व अष्टपैलु रोस्टन चेसवर मोठी जबाबदारी असेल.
अंतिम संघ
भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के एल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, रुषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदिप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी
वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्राथवेट, रोस्टन चेस, देवेंद्र बिशु, डाउरीच, होप, अंब्रिस, गेब्रिल, हेटमायर, पॉल, लेव्हिस
Leave a Reply