दुसऱ्या कसोटीत १० गड्यांनी विजय मिळवत भारताने २-० ने मालिका खिशात घातली, पृश्वी शॉ ठरला मालिकावीर

पहिल्या कसोटीत १ डाव आणि २७२ धावांनी पराभव स्विकारल्यानंतर हैद्राबाद येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजने पॉल व लेविसच्या जागी जेसन होल्डर व वॉरिकनचा समावेश केला होता तर भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकुरचा समावेश केला होता.  पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या शार्दुल ठाकुरच्या मांडीचा स्नायु दुखावल्यामुळे त्याला त्याचे दुसरे षटक देखिल पुर्ण करता आले नाही. हा भारतीय संघासाठी धक्का होता आणि उमेश यादव व तीन फिरकी गोलंदाजांवर संघाची पुर्ण जिम्मेदारी होती.

India-won

वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी सावध पवित्रा घेतला होता. बिनबाद ३३ अशी सावध सुरुवात केल्यानंतर कुलदिप यादवच्या गोलंदाजीने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला भगदाड पाडले आणि वेस्ट इंडीजची अवस्था ३८.५ षटकांत ५ बाद ११३ झाली होती. पहिल्या कसोटी प्रमाणेच वेस्ट इंडीजचा संघ गुडघे टेकतो का? असेच वाटत होते पण अष्टपैलु रोस्टन चेसने (१०६) सुरुवातीला शेन डाऊरीच (३०) सोबत ६ व्या गड्यासाठी ६९ धावांची तर ७ व्या गड्यासाठी कर्णधार जेसन होल्डर (५२) सोबत १०४ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ३०० च्या जवळ पोहचवली. त्यानंतर उमेश यादवच्या भेदक गोलंदाजी समोर तळाचे फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या दिवशी ३११ धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजला ३११ धावांत रोखण्यात महत्त्वाची भुमिका निभावली ती उमेश यादवने. उमेशने ८८ धावा देत ६ गडी बाद करत कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तर त्याला साथ दिली ती कुलदिप यादव (३ बळी) व रविचंद्रन अश्विनने (१ बळी).

आपल्या पदार्पणाच्या कसोटी शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ कडुन पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा होती तर मागिल काही सामन्यांत अपयशी ठरलेल्या राहुलकडे सर्वांचे लक्ष होते. पृथ्वी शॉ व के एल राहुलने धमाकेदार सुरुवात करत ८.४ षटकांत ६१ धावांची सलामी दिली यात राहुलचा वाटा होता फक्त ४ धावांचा. पृथ्वी शॉने अर्धशतक साजरे केले. पृथ्वी शॉ ७० धावा काढुन बाद झाल्यानंतर ४ धावांच्या अंतराने चेतेश्वर पुजारा बाद झाला आणि भारतीय संघाची अवस्था ३ बाद १०२ झाली होती. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ४ थ्या गड्यासाठी ६० धावांची भागिदारी केली पण ४५ धावा काढुन विराट बाद झाल्यानंतर रहाणे व रिषभ पंतच्या जोडीने ५ व्या गड्यासाठी १५२ धावांची भागिदारी करत आघाडी मिळवुन दिली पण दोघेही शतके करण्यास अपयशी ठरली. तीसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना झटपट बाद करत भारताचा डाव ३६७ मध्ये संपुष्टात आणला आणि पहिल्या डावात भारताने ५६ धावांची आघाडी घेतली. एक वेळ भारतीय संघ मोठी आघाडी घेतो का असे दिसत असताना वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने ५६ धावांत ५ बळी घेत महत्त्वाची भुमिका पार पाडली तर त्याला गेब्रिल व वॉरीकनने योग्य साथ दिली.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची सुरुवात निराशजनक झाली पहिल्या ४ षटकांत त्यांचे सलामीवीर परतले होते. त्यानंतर ४ चेंडूंच्या अंतराने हेतमायर व होप परतले तेव्हा वेस्ट इंडिजची अवस्था ४ बाद ४५ झाली होती. आता वेस्ट इंडिजची जिम्मेदारी पुर्णपणे पहिल्या डावातील शतकवीर चेस व होल्डरवर होती पण त्यांचा ही भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही आणि त्यांचा दुसरा डाव फक्त १२७ धावांत संपुष्टात आला यात अंब्रिसच्या सर्वाधिक ३८ धावा होत्या. पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या उमेश यादवने याही डावात ४ बळी घेत कसोटि कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सामन्यांत १० बळी घेण्याची किमया केली आणि त्याला जडेजा, अश्विन व कुलदिपने योग्या साथ दिली.

भारतीय संघाला विजयासाठी ७२ धावांची आवश्यकता होती आणि हे लक्ष्य भारताच्या सलामीवीरांनी पार करत संघाला १० गड्यांनी विजय प्राप्त करुन दिली आणि भारताने २-० ने मालिका खिशात घातली. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात असे सामन्यांत १० बळी घेणाऱ्या उमेश यादवला सामनावीर पुरस्काराने तर आपल्या पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक २३७ धावा फटकावणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: