आर्यलॅंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यांत अफगाणिस्ताननी ७ गड्यांनी विजय मिळवत नोंदवला पहिला कसोटी विजय

      २०१८ मध्ये अफगाणिस्ताने भारताविरुद्ध तर आर्यलॅंडने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला कसोटीत पदार्पण केले. दोन्ही संघ आपला दुसरा कसोटी सामना तब्बल ८ – ९ महिन्यांनंतर  देहराडुनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळणार होते. या सामन्यांआधी  अफगाणिस्ताने टी-२० मालिका ३-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पहिल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांना पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे दोन्ही संघ आपला पहिला कसोटी विजय मिळवण्यास उत्सुक होते. आर्यलॅंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आर्यलॅंडनकडुन मॅकुलम, पॉईंटर, डॉकरेल, मॅकब्रिन आणि कॅमरुन-डाऊ तर अफगाणिस्तानकडुन इहसानुल्लाह, इक्रम अली खिल आणि वकार सलामखेहील पदार्पणाचा सामना खेळत होते.

       सलामीवीर कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड व पॉल स्टर्लिंगने संघाला सावध पवित्रा घेत त्यांनी ३७ धावांची सलामी दिली पण त्यानंतर यमीन अहमदझाई, मोहम्मद नबी, रशीद खान व वकार सलामखेहीलच्या गोलंदाजीसमोर आर्यलॅंडची अवस्था बिनबाद ३७ वरुन संघाची अवस्था ९ बाद ८५ झाली होती. त्यानंतर डॉकरेल (३९) आणि ११ व्या क्रमांकावरील मुर्तागने (५४*) डाव सावरत संघाला १७२ धावांपर्यंत पोहचवले. आर्यलॅंडकडुन मुर्तागने सर्वाधिक नाबाद ५४ धावा काढल्या. अफगाणिस्तानकडुन यमीन अहमदझाई आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी ३ गडी बाद केले व राशिद खान आणि वकार सलामखेहील प्रत्येकी २ गडी बाद करत त्यानां चांगली साथ दिली.

      आर्यलॅंडला १७२ धावांत रोखल्यानंतर एहसानुल्लाहच्या रुपाने अफगाणिस्तानला पहिला झटका लागला पण त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी ४१ धावांची भर घातल्यानंतर मोहम्मद शेहझाद ४० धावांवर बाद झाला. ६८ धावांत २ गडी गमावल्यानंतर रहमत शाह व हशमतुल्लाह शहीदीने जम बसल्यानंतर डाव सांभाळला. या भागिदारी दरम्यांन त्या दोघांनी आपापली अर्धशतके झळकावली. तीसऱ्या गड्यासाठी १३० धावांची भागिदीरी केल्यानंतर शहीदी ६१ धावांवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाह ९८ धावांवर असताना रहमत शहा बाद झाला. शहा बाद झाल्यानंतर असगर अफगाणीने एक बाजू सांभाळली होती पण त्याला दुसऱ्याबाजूने साथ मिळाली नाही. रहमत शहा, असगर अफगाणी आणि शहीदीच्या अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या. यासोबतच अफगाणिस्तानने पहिल्या डावात १४२ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. आर्यलॅंडकडुन थॉम्पसनने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

      १४२ धावांनी पिछाडीवर असलेल्या आर्यलॅंडला पहिल्याच षटकांत पोर्टरफिल्डच्या रुपाने पहिला धक्का बसला त्यानंतर स्टर्लिंगही लगेचच माघारी परतला. ३३ धावांत दोन गडी गमावल्यानंतर बालर्बिन (८२) व मॅकुलम (३९) ने संघाचा डाव सावरत संघाची धावसंख्या १०० च्या पार नेली. त्यातच बालर्बिनने आपले पहिले कसोटी अर्धशतक साजरे केले. बालर्बिन आपल्या पहिल्या कसोटी शतकाकडे आगेकुच करत होता पण वकार सलामखेहीलने बालर्बिनला ८२ धावांवर बाद करत संघाला मोठे यश मिळवुन दिले. बालर्बिन व मॅकुलमने तीसऱ्या गड्यासाठी १०४ धावा जोडल्या. २ बाद १३७ वरुन आर्यलॅंडची अवस्था ६ बाद १५७ झाली होती यात अफगाणिस्तानकडुन मोलाचा वाट उचलला तो राशिद खानने. त्यानंतर केविन ओब्रायन व डॉकरेलने ७ व्या गड्यासाठी ६३ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर पुन्हा एकदा आर्यलॅंडने १० धावांत ३ गडी गमावले. पण पहिल्या डावाप्रमाणेच या डावात ही आर्यलॅंडच्या शेवटच्या जोडीने ५८ धावांची भर टाकली आणि आर्यलॅंडचा दुसरा डाव २८८ धावांत संपुष्टात आला. आर्यलॅंडकडुन बालर्बिनने ८२ तर केविन ओब्रायनने ५६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडुन राशिद खानने पहिल्यांदाच कसोटी कारकिर्दीत एका डावात ५ गडी बाद केले.

       १४७ धावांचा आव्हान घेऊन मैदानात आलेल्या अफगाणिस्तानने सावध पवित्रा घेतला होता. ९.४ षटकांत ५ धावा झाल्या असताना मॅकब्रिनने शेहझादला २ धावांवर बाद केले. त्यानंतर इहसानुल्लाह व पहिल्या डावात ९८ धावांची खेळी केलेल्या रहमत शहाने आर्यलॅंडला सामन्यांत परतण्याची संधीच दिली नाही. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. इहसानुल्लाह व रहमत शहा संघाला विजय मिळवुन देतील असे दिसत होते पण विजयासाठी ३ धावांची आवश्यकता असताना रहमत शहा (७६) व मोहम्मद नबी (१) दोन चेंडूत माघारी परतले. पण हसमतुल्लाहने कॅमरुन डाऊच्या गोलंदाजीवर चोकार मारत संघाला ७ गड्यांनी विजय मिळवुन दिला. अफगाणिस्तानकडुन रहमत शहाने ७६ तर इहसानुल्लाहने नाबाद ६५ धावा काढल्या तर आर्यलॅंडकडुन मॅकब्रिन व कॅमरुन डाऊने प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यांत ९८ व ७६ धावांची खेळी केलेल्या रहमत शहाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: