२०१९ च्या लोकसभा निवडणुकां आणि २०१९ च्या विश्वचषक लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा नेहमीपेक्षा लवकर सुरु होणार आहे. २०१९ च्या आयपीएल सत्राची सुरुवात आजपासुन चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. पहिल्याच सामन्यांत बेंगलोरसमोर आव्हान असेल ते म्हणजे तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंगचे. दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतलेल्या चेन्नई सुपर किंगच्या संघाने २०१८ मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाला ६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
चेन्नईचा संघ २०१८ च्या सत्राची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल तर पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळण्याच्या इराद्यात बेंगलोरचा संघ असेल. आतापर्यंतचा चेन्नई व बेंगलोरमधील सामन्यांचा रेकॉर्ड पाहता हे दोन्ही संघं एकमेकांविरुद्ध २३ वेळा भिडले आहेत त्यात चेन्नईने १५ वेळेस, बेंगलोरने ७ वेळेस विजय मिळवला तर एक सामना अनिर्णीत राहिला. बेंगलोरने चेन्नईविरुद्ध शेवटचा विजय २०१४ च्या आयपीएल सत्रात मिळवला होता तर चेन्नईत चेन्नईविरुद्ध बेंगलोरने २००८ मध्ये म्हणजे आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला होता. त्यामुळे रेकॉर्ड सुधारण्यास विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा बेंगलोरचा संघ उत्सुक असेल.
२०१८ च्या सत्रात अंबाती रायडु, शेन वॉटसन, कर्णधार धोनी, सुरेश रैना, शार्दुल ठाकुर, ड्वेन ब्राव्होने महत्त्वाची भुमिका बजावली होती त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडुन तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. पण सर्वांचे लक्ष असेल ते म्हणजे अंबाती रायडुच्या कामगिरीकडे. दुखापतीमुळे लुंगी एन्गिडीने सत्रातुन माघार घेतली आहे त्यामुळे संघाला त्याची कमतरता नक्कीच भासेल. २०१९ च्या सत्रासाठी बेंगलोरने मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, नॅथन कुल्टर नील व शिवम दुबेला आपल्या संघात सामावुन घेतले आहे आहे त्यामुळे फलंदाजीसोबतच गोलंदाजीही भक्कम केली आहे. शिमरॉन हेटमायर व युवा अष्टपैलु खेळाडु शिवम दुबे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. मार्कस स्टॉयनिस व नॅथन कुल्टर नील एप्रिल मध्ये संघात सामील होतील तो पर्यंत कॉलिन डी ग्रॅंडहोमे व टीम आउदी त्यांची जागी घेतील.
चेन्नई संभावित संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडु, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, कर्ण शर्मा/ हरभजन सिंग, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर, दिपक चहर
बेंगलोर संभावित संघ – विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, ए बी डीव्हीलीयर्स, मार्कस स्टॉयनिस/ कॉलिन डी ग्रॅंडहोमे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर/अक्षदिप नाथ, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, टीम आउदी/ नॅथन कुल्टर नील
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply