बांग्लादेशचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, अष्टपैलु शाकिब ठरला सामनावीर

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यांत यजमान इंग्लंडकडुन १०७ धावांनी पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी लयीत येण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे बांग्लादेश आपला पहिला सामना खेळत होता. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत जलदगती गोलंदाजांचा वरचष्म राहिला होता त्यामुळे बांग्लादेशच्या फलंदाजांसमोर आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांचे आव्हान होते. आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आफ्रिकेनी संघात दोन बदल करत दुखापतग्रस्त अमलाच्या जागी मिलरला संधी मिळाली होती तर प्रिटोरीयसच्या जागी ख्रिस मॉरीसला संधी मिळाली होती.

BAN-vs-SA-win

सलामीला आलेल्या तमिम इक्बाल व सौम्य सरकारने शानदार सुरुवात करुन दिली त्यात सरकार हा तमिम पेक्षा चांगल्या लयीत दिसत होता. ६० धावांची सलामी दिल्यानंतर तमिम १६ धावांवर बाद झाला त्यानंतर लगेचच सरकार माघारी परतला. बिनबाद ६० वरुन संघाची अवस्था २ बाद ७५ झाली होती. त्यानंतर संघाची जिम्मेदारी आली होती ती अनुभवी शाकिब अल हसन व मुशफिकर रहिमवर. या दोघांनी खेळपट्टीवर जम बसल्यावर सर्वच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बघता-बघता दोघांनी आपापली अर्धशतके साजरी केली. दोघेही शतकाकडे आगेकुच करत असताना ताहिरने शाकीबला ७५ धावांवर त्रिफळाचीत करत १४२ धावांची भागिदीर तोडली. त्यानंतर पुढील ३३ धावांत बांग्लादेशने आणखी दोन गडी गमावले आणि बांग्लादेशने ४२.१ षटकांत ५ गडी गमावत २५० धावा केल्या होत्या. आता शेवटच्या ८ षटकांत बांग्लादेश किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते पण महमदुल्लाहने मोसदेकसोबत ६६ धावांची भागिदारी करत संघाला ३०० च्या पार नेले. महमदुल्लाहच्या नाबाद ४६ धावांनी संघाला ३३० पर्यंत पोहचवले. आफ्रिकेकडुन फेहलुकवायो, ताहिर व मॉरीसने प्रत्येकी २ गडी बाद केले.

३३१ धावांचे आव्हान तसे कोणत्याच मैदानावर सोपे नसते त्यामुळे आफ्रिकेला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. डी कॉक व मार्करमने तशी करुन दिली पण एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात डी कॉक धावबाद झाला. त्यानंतर ड्युप्लेसिस व मार्करमने डाव सावरला असे दिसत असतानाच मार्करम ४५ धावांवर त्रिफळाचीत झाला. आता संघाची जिम्मेदारी पुर्णपणे फाफ वर आली होती. फाफ चांगल्या लयीत दिसत होता आणि मिलरने त्याला योग्य साथ दिली. फाफ ६२ धावांवर बाद झाल्यानंतर मिलरने ड्युसेनसोबत ५५ धावांची महत्त्वाची भागिदारी केली पण दोघेही एका पाठोपाठ परतले आणि बांग्लादेशने सामन्यांवर वर्चस्व ठेवले. ड्युमिनीने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला पण तो संघाला पराभवापासुन वाचवु शकला नाही आणि बांग्लादेशने आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव करत २०१९ च्या विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. बांग्लादेशकडुन मुस्तफिजुर रहेमानने सर्वाधिक ३ गडी बाद केले. सामन्यांत ७५ धावा व १ गडी बाद करणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: