श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे विश्वचषकाचा प्रबळ दावेदार इंग्लंडच्या अडचणीत वाढ

            पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या इंग्लंडने त्यानंतर बांग्लादेश, वेस्ट इंडिज व अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवले आणि इंग्लंडचा संघ चांगल्या लयीत दिसत होता त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांत इंग्लंडचा संघच वरचढ दिसत होता. तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी श्रीलंकेसाठी विजय आवश्यक होता पण मागील काही वर्षांतील श्रीलंकेची कामगिरी पाहता एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इंग्लंडविरुद्ध दर्जेदार कामगिरी करावी लागणार होती.

SL vs ENG.png

            श्रीलंकेनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता सुरुवात निराशजनक झाल्यानंतर अनुभवी खेळाडु अॅजेलो मॅथ्युजने नाबाद ८५ तर अविष्का फर्नांडोने ४९ व कुसल मेंडीसने ४६ धावांची खेळी करत संघाला २३२ पर्यंत पोहचवले. तसं इंग्लंडच्या तगड्या फलंदाजीसाठी २३३ धावांच आव्हान मोठं नव्हतं पण लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. पण आधी विश्वचषकात चांगल्या लयीत असलेल्या जो रुटने ५७ धावांची त्यानंतर बेन स्टोक्सने नाबाद ८२ धावांची खेळी पण ते ही संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरले आणि श्रीलंकेनी इंग्लंडवर २० धावांनी विजय मिळवला.

         इंग्लंडविरुद्धच्या विजयाने श्रीलंकेनी ६ सामन्यांत ६ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ ६ सामन्यांत ८ गुणांसह तीसऱ्या स्थानी आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडचे उर्वरित ३ सामने ऑस्ट्रेलिया, भारत व न्युझिलंडविरुद्ध आहेत त्यामुळे विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या यजमान इंग्लंडचा संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी इंग्लंडलाऑस्ट्रेलिया, भारत व न्युझिलंड यांसारख्या तगड्या संघासोबत शानदार कामगिरी करावी लागेल. इंग्लंडच्या पराभवामुळे श्रीलंकेसोबतच बांग्लादेशच्या पुढील फेरीत जाण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत बहुतेक सामने हे एकतर्फी झाले आहेत त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाने विश्वचषकात जाण आली आहे. आता सर्वच सामन्यांवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.

शंतनु कुलकर्णी

 

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: