वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासुन चैन्नईत सुरुवात

     टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे तर दुसरीकडे टी-२० मालिकेतील पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय मालिकेत आणखी त्वेषाने मैदानात उतरणार यात काही शंका नाही. भारताविरुद्धच्या मालिकेपुर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वेस्ट इंडिजने ३-० ने विजय मिळवला होता त्यामुळे त्याचा फायदा त्यांना या मालिकेत होऊ शकतो. मागिल काही वर्षांतील वेस्ट इंडिजची मोठ्या संघाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी निराशजनक आहे त्यामुळे कामगिरी सुधारण्यावर संघाचा भर असेल.1st ODI

      २०१८ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताने ३-१ ने विजय मिळवला होता पण शिमरॉन हेटमायर व शाय होपने जबरदस्त फलंदाजी केली होती. अशाच कामगिरीची अपेक्षा वेस्ट इंडिज संघाला असेल. यासोबतच निकोल्स पुरन, किरॉन पोलार्ड, रोस्टन चेसकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा वेस्ट इंडिज संघाला असेल. तर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर. अलझारी जोसेफ, कॅरी पियर, हेडन वॉल्शवर. चैन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस पोक्षक असल्याने कर्णधार पोलार्ड दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो.

       दुखापतग्रस्त शिखर धवन व भुवनेश्वर कुमारच्या जागी अनुक्रमे मयंक अगरवाल व शार्दुल ठाकुरला संघात स्थान देण्यात आले आहे. के एल राहुलचा सध्याची कामगिरी पाहता तोच रोहित शर्मासोबत  सलामीला खेळेल त्यामुळे मयंकला एकदिवसीय पदार्पणासाठी सध्यातरी वाट पाहावी लागेल हे मात्र नक्की. सध्याची रिषभ पंतची कामगिरी भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनाच्या अडचणीत भऱ घालत आहे. त्यामुळे रिषभच्या जागी राहुलला यष्टिरक्षणाची जबाबदारी देऊन त्याच्या जागी मनीष पांडेची संघात वर्णी लागु शकते. फिरकीस पोक्षक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ शमी, दिपक चहर जडेजा, कुलदिप व यजुवेंद्र चहलसहं मैदानात उतरु शकतो. तसेच अष्टपैलु खेळाडु शिवम दुबे या सामन्यांत एकदिवसीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.

संभावित संघ

भारत:- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रिषभ पंत/मनीष पांडे, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदिप यादव, दिपक चहर, यजुवेंद्र चहल

वेस्ट इंडिज:- किरॉन पोलार्ड (कर्णधार), शाय होप, ब्रॅंडन किंग/सुनिल अॅब्रिस, शिमरॉन हेटमायर, निकेल्स पुरन, रोस्टन चेस, जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल, अलझारी जोसेफ, कॅरी पियर, हेडन वॉल्श

— शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: