आयपीएल २०२०: कोणाला लागणार लॉटरी?

              २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आयपीएल २०२० महत्वाची असणार आहे. आयपीएल २०२० ची तयारी म्हणून सर्व संघांनी ट्रेडिंग विंडो मधून आपल्या संघात काही खेळाडूंना सामावून घेतले तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बाहेरचा रस्ता दाखवलेल्या खेळाडूंत दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत कोणत्या खेळाडूंची लॉटरी लागते हे पाहावे लागेल. ट्रेडिंग विंडो मध्ये दिल्ली कॅपिटल्सने २०१९ च्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवलेला व भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व २०१९ च्या आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवलेल्या रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात सामावून घेत लिलावाच्या आधीच बाजी मारली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्ट व धवल कुलकर्णीला सामावून घेत आपली गोलंदाजी आणखीन भक्कम केली आहे. २०१९ च्या आयपीएल सत्रात रविचंद्रन अश्विनने कर्णधारपद भुषवले होते पण ट्रेडींग विंडोमध्ये अश्विनला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले आहे त्यामुळे पंजाबचा संघ कर्णधारपदासाठी कोणत्या खेळाडुला संघात सामावुन घेतो की के एल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येते हे पाहावे लागेल.

IPL2020

              आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी ९७१ खेळाडुंची नावे आली होती पण आठ फ्रॅंचाईजकडुन ७३ जागांसाठी ३३२ खेळाडुंची नावे अंतिम करण्यात आली आहेत. त्यामुळे १९ डिसेंबर रोजी आयपीएल चषकाआधी लिलावात कोण आघाडी घेतो हे पाहावे लागेल.

ट्रेडींग विंडो द्वारे दुसऱ्या संघात गेलेले खेळाडु

 • मयंक मार्कंडेय (मुंबई इंडियन्स कडुन दिल्ली कॅपिटल्स)
 • शेर्फेन रुदरफोर्ड (दिल्ली कॅपिटल्स कडुन मुंबई इंडियन्स)
 • रविचंद्रन अश्विन (किंग्स इलेव्हन पंजाब कडुन दिल्ली कॅपिटल्स)
 • जगदिश सुचित (दिल्ली कॅपिटल्स कडुन किंग्स इलेव्हन पंजाब)
 • ट्रेंट बोल्ट (दिल्ली कॅपिटल्स कडुन मुंबई इंडियन्स)
 • कृष्णप्पा गौतम (राजस्थान रॉयल्स कडुन दिल्ली कॅपिटल्स)
 • अंकित राजपुत (किंग्स इलेव्हन पंजाब कडुन राजस्थान रॉयल्स)
 • धवल कुलकर्णी (राजस्थान रॉयल्स कडुन मुंबई इंडियन्स)
 • अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स कडुन दिल्ली कॅपिटल्स)
 • राहुल टेवाटिया (दिल्ली कॅपिटल्स कडुन राजस्थान रॉयल्स)
 • सिद्धेश लाड (मुंबई इंडियन्स कडुन कोलकत्ता नाईट रायडर्स)

             सर्व आठ ही संघांचा विचार करता किंग्स इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक ४२.७ कोटी, कोलकत्ताकडे ३५.६५ कोटी रक्कम उपलब्ध आहेत तर बेंगलोरकडे सर्वाधिक १२ तर दिल्ली, कोलकत्ता व राजस्थानकडे प्रत्येकी ११ खेळाडुंच्या जागा उपलब्ध आहेत. मुंबईकडे सर्वात कमी १३.०५ कोटी रक्कम शिल्लक आहे त्यामुळे त्यात ते खेळाडुंची निवड कशी करतात हे पाहावे लागले. तसे पाहिले तर ट्रेडींग विंडोत बोल्ट, रुदरफोर्ड व धवल कुलकर्णीला संघात सामावुन घेत मुंबईने लिलावा पुर्वीच बाजी मारली आहे. त्यामुळे उपलब्ध रक्कम व खेळाडुंच्या जागा यांची सांगड कशी घातली जाते हे पाहावे लागेल.

या खेळाडुंवर असेल संघांची नजर

भारतीय:- रॉबिन उथप्पा, यशस्वी जैस्वाल, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, दिपक हुडा, रोहन कदम, इशान पोरेल, शाहरुख खान, पियुष चावला

परदेशी:- ख्रिस लिन, शिमरॉन हेटमायर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, इऑन मॉर्गन, सॅम करन, अॅरॉन फिंच, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस मॉरीस, नेथन कुल्टर नील, जिमी निशम, केसरीक विल्यम्स, अॅण्ड्रु टाय, लेंडल सिमन्स, टिम सेईफर्ट, ग्लेन फिलिप्स, डेविड विली, अलझारी जोसेफ, ख्रिस वोक्स, मार्कस स्टॉयनिस, इविन लुईस, नुर अहमद, ख्रिस ग्रिन, बेन कटिंग

#IPLAuction2019

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: