मार्च मध्ये ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाही त्यात काही देशांमध्ये प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामने व वेस्ट इंडीजमध्ये कॅरबियन टी-१० लीग खेळविण्यात आली होती. तसेच इंग्लंडने खेळाडुंना वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सरावासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रेक्षकांशिवाय होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांची मालिकेची घोषणा केली आहे यातील पहिला सामना ८ जुलै रोजी हॅम्पशायर येथे तर उर्वरित दोन सामने मॅंचेस्टर येथे १६ व २४ जुलै रोजी खेळविण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाचे ९ जुन रोजी इंग्लंडमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर १४ दिवसांसाठी त्यांना कॉरंटाईन करण्यात येणार आहे. याच मालिकेसाठी वेस्ट इंडिजने जेसन होल्डरच्या नेतृत्वातील आपला संघ जाहीर केला आहे. एकीकडे डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या अनुभवी खेळाडुंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास असहमती दर्शवली असताना त्यांच्या जागी केमर होल्डर, बोनेरला संधी देण्यात आली आहे. केमर होल्डरने २०१९ च्या अंडर-१९ विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्याची देशांतर्गत स्पर्धांतली कामगिरी सुद्धा सरस राहिली आहे. २०१९-२० च्या सत्रात त्याने १८.९१ च्या सरासरीच्या सहाय्याने त्याने ३६ बळी टिपले होते तर दुसरीकडे जमैकन अष्टपैलु खेळाडु बोरेनने मागच्या सत्रात ५२३ धावा केल्या होत्या.
केमर, बोरेनच्या सोबतच रिफर व ब्लॅकवुडने आपल्या कामगिरीच्या बळावर संघात स्थान मिळवले आहे. ब्लॅकवुडने सत्रात ५१ च्या सरासरीने सर्वाधिक ७६८ धावा केल्या होत्या त्यात लिवर्ड आयलंडविरुद्ध खेळलेल्या २४८ धावांच्या खेळीचा समावेश होता. हे ब्लॅकवुडचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले वहिलेच द्विशतक होते. १४ खेळाडुंसोबतच वेस्ट इंडिजने ११ राखिव खेळाडुंची निवड सुद्धा केली आहे. पहिल्यांदा ही कसोटी मालिका मे-जुन मध्ये खेळविण्यात येणार होती पण कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ती जुलै मध्ये खेळविण्यात येणार आहे.तसेच मार्च मध्ये ऑस्ट्रेलिया – न्युझिलंड यांच्या मधील एकदिवसीय मालिकेनंतर पहिल्यांदाच एखादी आंतरराष्ट्रीय मालिका खेळविण्यात येणार आहे आणि हि मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी महत्त्वाची असेल हे मात्र नक्की.
संघ:- जेसन होल्डर (कर्णधार), जेरमेन ब्लॅकवुड, न्कुरमाह बोनेर, क्रेग ब्राथवेट, शमराह ब्रुक्स, जॉन कॅंम्बेल, रोस्टन चेस, रखिम कॉर्नवॉल, शेन डावरिच, केमर होल्डर, शाइ होप, अलझारी जोसेफ, रेमॉन रिफर, केमर रोच
राखिव खेळाडु :- सुनिल अंब्रिस, जोशुवा डा सिल्वा, शेनॉन गॅब्रिल, किऑन हार्डिंग, काइल मेयर्स, प्रेस्टन मॅकस्विन, मार्क्विनो मिंडली, शेन मोझली, अॅडरसन फिलीप, ओशेन थॉमस, जोमेल वॉरिकन
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply