जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत काही देशातील फुटबॉल सामने व कॅरेबियन मधील टी-१० स्पर्धा सोडल्यास कोणतीही मोठी स्पर्धा खेळविण्यात आली नव्हती. त्यातच आता ह्या आठवड्याच्या शेवटी महाराणीच्या वाढदिवसानिमित्त डार्विन येथे टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट हळुहळु पुर्वपदावर येण्यास मदत होईल हे मात्र नक्की.
https://platform.twitter.com/widgets.jsCricket will resume in the Northern Territory this weekend! Details here 👇 @NTCrickethttps://t.co/293f6nrkkN
— cricket.com.au (@cricketcomau) June 4, 2020
१३ मार्च, २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे कोणाताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. काही देशांमध्ये प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामने तर वेस्ट इंडीजमध्ये टी-१० स्पर्धा खेळविण्यात आली होती. त्यातच आता ऑस्ट्रेलियात डार्विन येथे ६ ते ८ जुन दरम्यान होणाऱ्या टी-२० मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच याआधी मागील एक महिन्यांत खेळविण्यात आलेले फुटबॉल व क्रिकेट सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आले होते पण डार्विन टी-२० स्पर्धेसाठी ५०० प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
डार्विन मध्ये २१ मे पासून एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही त्यामुळे येथे प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्पर्धेत डार्विन प्रिमियर ग्रेड क्लबचे ७ संघ आणि उत्तर विभागातील सर्वोत्तम खेळाडुंचा एक संघ अश्या ८ संघाचा स्पर्धेत सहभाग असेल. सीडीयु टॉप एंड टी-२० स्पर्धेत राऊंड रॉबिन पद्धतीने १५ सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने मरारा क्रिकेट ग्राऊंड, गार्डन्स ओव्हल आणि काझली ओव्हल येथे खेळविण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत चेंडूची चकाकी कायम राखण्यासाठी चेंडूवर थुंकीचा उपयोग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply