कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धांवर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळण्याची शक्यता असु शकते पण हे असे होईलच असे नाही पण असे झाले तर त्यांचे संघ कसे असतील. समजा इंग्लंडचा संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतो तर दुसरीकडे इंग्लंडचा टी-२० संघ भारताविरुद्ध मालिका खेळतो यासाठी त्याचे संघ कसे असु शकतात यासाठी इंग्लंडच्या माजी खेळाडु इयान बेल, मार्क बुचर व गॅमी स्वानने आपापले कसोटी व टी-२० संघ जाहीर केले आहेत. काही दिवसांपुर्वी इंग्लंडसंघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅश्ले जाईल्सने दोन वेगवेगळ्या संघांबद्दल भाष्य केले होते. निवडलेल्या ५५ खेळाडुंपैकी काही खेळाडु हे एकाच स्वरुपाच्या क्रिकेट मध्ये निवडले जातात पण काही खेळाडु हे दोन्ही प्रकारात महत्त्वाचे ठरु शकतात.
२०२० चा टी-२० विश्वचषक जवळ आला असताना इयान बेलने टी-२० संघात जॉनी बेअरस्टो व जोस बटलर या दोन तगड्या खेळाडुंना संधी देण्यात आली आहे तर गोलंदाजीची धुरा ही जोफ्रा आर्चरवर असेल. जॉनी बेअरस्टो व जोस बटलर यांच्या अनुपस्थितीत बेन फोक्सला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे तर गोलंदाजीची धुरा ही अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अॅडरसनवर देण्यात आली आहे. या दोघांच्या सोबत मार्क वुड व ख्रिस वोक्सला निवडले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१९ च्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भुमिका बजावलेल्या अष्टपैलु बेन स्टोक्सला कसोटी संघात निवडले आहे.
इयान बेलचे संघ
कसोटी संघ:- रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, झॅक क्राउली, जो रुट, ओली पोप, बेन स्टोक्स, बेन फोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच, जेम्स अॅडरसन, ख्रिस वोक्स (१२ वा खेळाडु)
टी-२० संघ:- जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, इयॉन मॉर्गन, टॉम बॅंटन, मोईन अली, सॅम करण, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, टॉम करण, अदिल रशिद, रिस टोपली (१२ वा खेळाडु)
जवळपास मागिल १० वर्षांत स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अॅडरसन हे दोघेही इंग्लंडच्या गोलंदाजीचा कणा राहिले आहेत पण मार्क बाऊचरने अॅडरसनला संघात स्थान दिले नाही तर बेल प्रमाणेच बाऊचरने सुद्धा बेन स्टोक्सला कसोटी संघात तर जॉनी बेअरस्टो व जोस बटलरला टी-२० संघात स्थान दिले आहे. तर गोलंदाजीत आर्चरच टी-२० संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळेल.
मार्क बाऊचरचे संघ
कसोटी संघ:- रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, झॅक क्राउली, जो रुट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, डॉम बेस, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम करण (१२ वा खेळाडु)
टी-२० संघ:- जेसन रॉय, टॉम बॅंटन, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, टॉम अॅबेल, जोस बटलर, मोईन अली, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, अदिल रशिद, रिस टोपली, टॉम करण (१२ वा खेळाडु)
बेल प्रमाणेच स्वॉनने कसोटी संघाच्या गोलंदाजीची धुरा अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अॅडरसनवर सोपवली आहे. स्वॉनने बेअरस्टो व जेसन रॉयच्या बरोबरीने अॅलेक्स हेल्सला टी-२० संघात संधी दिली आहेत.
ग्रॅमी स्वानचे संघ
कसोटी संघ:- रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, झॅक क्राउली, जो रुट, ओली पोप, बेन स्टोक्स, बेन फोक्स, डॉम बेस, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅडरसन, टॉम करण (१२ वा खेळाडु)
टी-२० संघ:- जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, मोईन अली, सॅम करण, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, टॉम करण, अदिल रशिद, टॉम मोर्स (१२ वा खेळाडु)
तीनही खेळाडुंनी निवडलेल्या संघात वरच्या फळीतील खेळाडु जवळपास सारखेच आहेत पण गोलंदाजीत काहीसे बदल आहेत. बेल, बाऊचर व स्वॉनने निवडलेल्या संघाचा विचार करता बेलने निवडलेला कसोटी संघ व स्वॉनने निवडलेला टी-२० संघ तगडा वाटतो.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply