वर्षातले १२ महिने जगातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात क्रिकेट स्पर्धा सुरुच असतात आणि असा कोणताही महिना नसतो ज्यात एकही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मागिल तीन महिन्यांपासुन कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली गेली नाही. मागील महिन्यांत वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन टी-१० स्पर्धा खेळविण्यात आली तर आजपासुन ऑस्ट्रेलियाच्या डार्विन मध्ये टी-२० स्पर्धा खेळविण्यात येत आहे तरीही क्रिकेट रसिकांचे डोळे मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे लागुन राहिले आहेत.
भारतीय क्रिकेट रसिक ही मागे नाहीत त्यात वर्षभर ज्या स्पर्धेकडे डोळे लावुन बसलेले असतात ती आयपीएल स्पर्धा ही सध्या तरी स्थगित केली आहे त्यामुळे आपले आवडते खेळाडु पुन्हा कधी मैदानावर खेळताना दिसतील याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मागील ३ महिन्यांत भरपुर स्पर्धा रद्द झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जर एकाच देशाचे दोन संघ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळत असतील त्यांचे संघ कसे असु शकतील हे पाहावे लागेल. यापुर्वी कसोटी व टी-२० सामन्यांत दोन दिवसांचे अंतर असल्याने ऑस्ट्रेलियाने दोन वेगवेगळे संघ निवडले होते आणि हेच जर भारतीय संघाबाबत झाले तर भारतीय कसोटी संघ व टी-२० संघ कसे असतील?
विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या,रविंद्र जडेजा हे क्रिकेटच्या सर्वच प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात तर इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, मयंक आगरवाल हे फक्त कसोटी संघाचे तर श्रेयस अय्यर, मनीष पांडे, चहल हे टी-२० संघाचे नेतृत्व करतात त्यामुळे दोन संघ निवडणे तसे अवघड पण एकाच वेळेस खेळण्यासाठी जर भारतीय कसोटी व टी-२० संघ निवडण्याची वेळ आली तर?
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कसोटी संघाचे सलामीवीर म्हणुन पृथ्वी शॉ व चेतेश्वर पुजारावर मोठी जिम्मेदारी असु शकते तर जलदगती गोलंदाजांच्या तिकडीसोबत अश्विनवर गोलंदाजीची धुरा असु शकते. संघात वृद्धिमान साहावर यष्टिरक्षणाची जिम्मेदारी असेल तसेच भारतीय संघ मायदेशात अथवा श्रीलंकेत खेळत असे तर कुलदिप यादवला अंतिम ११ मध्ये संधी मिळु शकते.
कसोटी संघ:- विराट कोहली (कर्णधार), मयंक आगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदिप यादव (१२ वा खेळाडु)
कसोटी व टी-२० संघ वेगवेगळे असल्याने टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही सलामीवीर रोहित शर्मावर असेल तर यष्टिरक्षक के एल राहुल, रोहितसोबत सलामीला येऊ शकतो तर विराटच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जिम्मेदारी ही अय्यर, मनिष पांडे व सुर्यकुमार यादववर असेल. त्यांच्या सोबतच हार्दिक पंड्या व रविंद्र जडेजा या अष्टपैलुना संघा संधी मिळु शकते तर गोलंदाजीची धुरा ही भुवनेश्वर कुमार व जसप्रित बुमराहवर असेल तर यष्टिरक्षक म्हणुनच जर कोणाला संधी दिली जाऊ शकते तर ती संजु सॅमसनला.
टी-२० संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, नवदिप सैनी, संजु सॅमसन (१२ वा खेळाडु)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply