कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर

कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात. सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने क्रिकेटविश्वात आपल्या खेळाने सर्वांना आकर्षित केले. सुनिल गावसकर म्हणजे ‘उंची लहान किर्ती महान’ असे व्यक्तिमत्व. १९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात गावसकरांचा संघात समावेश झाला. परंतु दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातुन बाहेर बसावे लागले. तरीही गावसकरांनी आपली पदार्पणाची मालिका आपल्याच नावे केली. 

      त्रिनीदाद मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि वेस्ट इंडिजविरुदध पहिला विजय मिळवला, हाच विजय भारताला मालिका जिंकवण्यात महत्त्वाचा ठरला. त्यानंतरच्या कसोटीत गावसकरांनी कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले आणि विक्रम स्थापन होण्यास सुरुवात झाली. आपल्या या खेळीत त्यांनी फ्लिक, स्ट्रेट ड्राईव्ह, स्केअर कट तसेच पुल यासारख्या फटक्यांची मेजवानी दिली आणि नव्या युगाला सुरुवात झाली. या मालिकेत ८ डावांत ४ शतके व ३ अर्धशतकासहीत ७७४ धावा ठोकल्या. यात शेवटच्या कसोटीत शतक आणि व्दिशतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सामन्यात सर्वाधिक १३ शतके आणि २७४९ धावांचा विक्रमही गावसकरांच्या नावे आहे. १३ शतकांमधील ७ शतके त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये फटकावली. गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत कधीही हेल्मेट वापरले नाही त्यानी फक्त पांढरी गोल टोपी आणि त्यासोबत डोक्यासाठी सुरक्षित कवच वापरले. परंतु ज्याप्रकारे गावसकरांनी वेस्ट इंडिजच्या तोफखाना समजल्या जाणाऱ्या गोलंदाजांचा सडेतोड समाचार घेतला.

      साल १९७१ पूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. एका तगड्या संघाला त्यांच्याच देशात हरवणे तितकेच अवघड होते परंतु हे काम केले ते मुंबईकर त्यावेळचा भारताचा कर्णधार अजित वाडेकर आणि सुनिल गावसकर त्यांना साथ दिली दिलीप सरदेसाई यांनी. १९७०-७१ ची मालिका जिंकवण्यात दिलीप सरदेसाई यांनी ६४२ धावा फटकावत गावसकरांना चांगली साथ दिली. भारताला जागतिक क्रिकेटमध्ये नवी दिशा देण्यास १९७०-७१ सालची वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरली.

      गावसकरांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती १९७८-७९ च्या मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत केली त्यात त्यांनी ७३२ धावांचा पाऊस पाडला. कसोटी कारकिर्दीत १०००० धावांचा पल्ला पार करण्याचा पहिला मान गावसकरांच्या नावोच आहे तसेच त्यांचा ३४ शतकांचा विक्रमही कित्येक वर्षे त्यांच्याच नावे होता त्यानंतर सचिन तेंडूलकरने मोडला. त्यामुळे ‘कॅरेबियनचा बादशहा’ म्हणून लिटल मास्टर सुनिल गावसकर नेहमिच अग्रस्थानी राहतील.


शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: