पहिला सामन्यांत पावसामुळे फक्त १६.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यांत यजमान इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानची सलामी जोडी फखर जमान व कर्णधार बाबर आझमने संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. फखर व बाबरच्या भागिदारीनंतर अनुभवी मोहम्मद हफीजने ३६ चेंडूत ४ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने ६९ धावांची खेळी करत संघाला निर्धारित २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारुन दिली होती पण मॉर्गन (६६) व मलानच्या नाबाद ५४ धावांनी संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली.
इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा संघ अजुनही विजयाची चव चाखु शकलेला नाही त्यामुळे १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या टी-२० मालिकेतील व दौऱ्यातील शेवटच्या सामन्यांत पाकिस्तान दौऱ्यातील पहिला वहिला विजय मिळवेल का यावर सर्वांच लक्ष्य असेल. १९६ धावांच भलमोठं लक्ष्य देऊन सुद्धा पाकिस्तानचे गोलंदाज इंग्लंडला रोखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले होते. पहिल्या सामन्यांत शानदार गोलंदाजी केलेले इमाद वासिम व शादाब खान सुद्धा मॉर्गन व मलान समोर अपयशी ठरले तर मोहम्मद अमीर सारखा अनुभवी गोलंदाज सुद्धा काही करु शकला नाही.
पाकिस्तानला जर मालिकेचा शेवट गोड करायचा असले तर कर्णधार बाबरला गोलंदाजीत बदल करावाच लागेल. दुसऱ्या सामन्यांत दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद अमीरच्या जागी अनुभवी वहाब रियाज किंवा मोहम्मद हुसनैनला संधी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ दुसऱ्या सामन्यांतील संघच कायम ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे इंग्लंडचा संघ कसोटी मालिके पाठोपाठ टी-२० मालिका सुद्धा खिशात घालतो की पाकिस्तानचा संघ मालिका बरोबरीत राखण्यात यशस्वी होतो हे पाहावे लागेल.
संभावित संघ
इंग्लंड – इयॉन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, टॉम बॅंटन, डेविड मलान, सॅम बिलिंग, लेविस ग्रेगोरी, मोईन अली, टॉम करण, ख्रिस जॉर्डन, अदिल राशिद, साकिब मेहमुद
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हफिज, शोएब मलिक, इमाद वासिम, शादाब खान, मोहम्मद रिझवान, हॅरीस रौफ, शाहिन आफ्रिदी, वहाब रियाझ/ मोहम्मद हुसनैन,
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply