१९ सप्टेंबर २०२० पासुन युएई मध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतेक सर्वंच खेळाडुंना सरावाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सर्वच संघ जोरदार सराव करत आहेत त्यातच ४ वेळेसचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. २००९ ते २०१९ पर्यंत मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे या सत्रातुन माघार घेतली आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅंडलवरुन करण्यात आली आहे.
लसिथ मलिंगाची माघार मुंबईसाठी मोठा धक्का असेल तसेच मलिंगाच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला संधी देण्यात आली आहे. मलिंगा १७० बळींसह आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. यावरुन मलिंगाचे मुंबई संघातील स्थानाचा अंदाज येईलच. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईच्या जलदगती गोलंदाजीची जसप्रित बुमराह, मिशेल मॅकलाघन, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईलवर असेल.
मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने यापुर्वी कोलकत्ता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३९ टी-२० सामन्यांत २४.१२ च्या सरासरीने व ८.२५ च्या इकॉनॉमीने पॅटीन्सनने ४७ बळी पटकावले आहेत. तसे पाहिले तर पॅटिन्सन सप्टेंबर २०१५ पासुन मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही पण २०१९-२० मध्ये झालेल्या बिग बॅश लीगमध्ये त्याने ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे पॅटिन्सन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply