यजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्धचे मायदेशातील वर्चस्व कायम राखेल की ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील पहिल्या टी-२० मालिका विजयाकडे आगेकुच करेल?

पाकिस्तानविरुद्धची टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राहिल्यानंतर यजमान इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० व एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यातील टी-२० मालिकेला आजपासुन सुरुवात होत आहे. दोन्ही संघांचा विचार करता इंग्लंडने मागील दोन – अडीच महिन्यांत दोन कसोटी मालिका,एक एकदिवसीय मालिका व एक टी-२० मालिका खेळली आहे तर ऑस्ट्रेलिया मार्च मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे जवळपास ६ महिन्यानंतर डेविड वॉर्नर, अॅरॉन फिंच व स्टिव्ह स्मिथ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचा भाग न राहिलेल्या जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मार्क वुड यांचा संघात समावेश केल्याने इंग्लंडच्या संघाची ताकद वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन केलेल्या मॅक्सवेल व स्टॉयनिसच्या कामगिरीवर क्रिकेट रसिकांची नजर असेल.  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत १६ सामने खेळवले गेले आहेत त्यात ऑस्ट्रेलियाने ९, इंग्लंडने ६ सामने जिंकले आहेत तर एका सामन्यांचा निकाल लागलेला नाही. पण मायदेशात खेळवलेल्या ६ सामन्यांत इंग्लंडने ४ सामने जिंकत वर्चस्व स्थापन केले आहे तर ऑस्ट्रेलियाला फक्त एक सामना जिंकता आला आहे.ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमधील एकमेव विजय २०१३ मध्ये साउधाम्पटन येथेच मिळवला होता जिथे तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

दोन्ही संघांचा विचार करता पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इंग्लंडच्या संघात दोन बदल होतील त्यात लेविस ग्रेगोरी व साकिब महमुदच्या जागी बटलर व आर्चरची संघात वर्णी लागेल. तर दुसरीकडे फिंचच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मदार फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेल या फलंदाजांवर व स्टार्क, कमिन्स,झंपा,टायवर असेल.आता मागील काही महिन्यांत सलग मालिका खेळणारा इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचे मायदेशातील टी-२० मधील वर्चस्व कायम राखतो की ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील आपली पहिली वहिली मालिका जिंकतो?

संभावित संघ

इंग्लंड – इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, टॉम बॅंटन, जॉनी बेअरस्टो, डेविड मलान,सॅम बिलिंग,मोईन अली, टॉम करण, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, ख्रिस जॉर्डन

ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यु वेड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लायन, अॅडम झंपा, अॅण्ड्रु टाय

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: