यजमान इंग्लंड मालिका खिशात घालणार की ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करेल?

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यांत १६३ धावांचा पाठलाग करताना कर्णधार अॅरॉन फिंच व डेविड वॉर्नरने ११ षटकांत ९८ धावांची सलामी दिली होती.ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात मिळाली होती त्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज सामना जिंकेल असेच दिसत होते. फिंच बाद झाल्यानंतरही वॉर्नर मैदानात टिकुन होता आणि तो संघाला सहज सामना जिंकुन देईल असे वाटत होते. १ बाद १२४ वरुन ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३३ झाली होती.शेवटच्या २१ चेंडूत ऑस्ट्रेलियाला ३० धावांची आवश्यकता होती आणि मैदानावर अष्टपैलु मार्कस स्टॉयनिस असल्याने सामना अजुनही त्यांच्याच हातात होता. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही आणि सामना २ धावांनी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी मिळवुन दिली.

पहिल्या सामन्यांत इंग्लंडकडुन डेविड मलान व यष्टिरक्षक जोस बटलर वगळता एकही फलंदाज आपले योगदान देऊ शकला नव्हता.दुसऱ्या सामन्यांत इंग्लंडला जॉनी बेअरस्टो व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या टॉम बेंटनकडुन मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.तसेच पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यांत अर्धशतकी खेळी केलेल्या मोईन अलीला फलंदाजीत छोटेसे का होईना आपले योगदान द्यावे लागेल.तसेच आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यांत इंग्लंडचा संघ पहिल्या सामन्यांतील संघच कायम ठेऊ शकतो.

एक शानदार सुरुवात मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला पहिला टी-२० सामना गमवावा लागला होता त्यामुळे मालिकेत टिकुन राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आजच्या सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे.मॅक्सवेल फलंदाजीत जरी अपयशी ठरला असला तरी त्याने गोलंदाजीत आपले योगदान दिले आहे तसेच उपकर्णधार पदावरुन पाय उतार करण्यात आलेल्या अॅलेक्स कॅरीच्या जागी मॅथ्यु वेडची वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको.तसेच मिशेल स्टार्क व अॅडम झंपा सुद्धा लय मिळवण्यास उत्सुक असतील.

संभावित संघ

इंग्लंड – इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, टॉम बॅंटन, जॉनी बेअरस्टो, डेविड मलान,मार्क वुड ,मोईन अली, टॉम करण, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, ख्रिस जॉर्डन

ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यु वेड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅस्टन एगार, अॅडम झंपा, केन रिचर्डसन

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: