जागतिक क्रिकेटमधील तगड्या खेळाडुंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आजपर्यंत विजेतेपद पटकावता आले नाही. २००९,२०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोर संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा बेंगलोर संघ आपल्या पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल हे नक्की.२०१४ मध्ये युएईमध्ये झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांत बेंगलोरला फक्त २ सामने जिंकता आले होते.यावेळेस संपुर्ण स्पर्धा युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे त्यामुळे बेंगलोरचा संघ कामगिरी उंचावण्यास उत्सुक असेल.
बेंगलोरने लिलावात अॅरॉन फिंच, इसरु उदाना, ख्रिस मॉरिस, देवदत्त पडिकल आणि जोशुआ फिलिप्सला संघात सामावुन घेत फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपली ताकद वाढवली आहे.त्यामुळे कर्णधार विराट कोहली व ए बी डीव्हिलियर्सवर अवलंबुन असलेल्या बेंगलोरने फिंचला संघात घेत विराट व ए बी डीव्हिलियर्स वरचा भार काहीसा कमी केला आहे.तरी देखिल बेंगलोरचा संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या चांगल्या भारतीय फलंदाजाची कमतरता दिसते त्यामुळे त्यांना शिवम दुबे व गुरकिरत सिंग मानवर अवलंबुन राहावे लागेल.
बेंगलोरच्या संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच, देवदत्त पडिकल, पार्थिव पटेल व मोईन अली वर असेल तर गोलंदाजीची धुरा वॉशिंग्टन सुंदर, इसरु उदाना,डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, नवदिप सैनी, यजुवेंद्र चहलवर असेल.तसेच युएईमधील मैदाने मोठे असल्याने फिरकी गोलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतील.पण चार परदेशी खेळाडु निवडणे कर्णधार कोहलीसाठी थोडे अवघड राहिल.चार पैकी ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंचचे स्थान निश्चित आहे त्यासोबतच गोलंदाजीसाठी मोईन अली, ख्रिस मॉरिस, इसरु उदाना,डेल स्टेन हे पर्यांय उपलब्ध आहेत यापैकी दोन खेळाडुंची अंतिम ११ मध्ये वर्णी लागु शकते.
सर्वोत्तम ११ – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल/ पार्थिव पटेल, ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, नवदिप सैनी, यजुवेंद्र चहल, उमेश यादव
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- विराट कोहली (कर्णधार),ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच,यजुवेंद्र चहल,शिवम दुबे,उमेश यादव,वॉशिंग्टन सुंदर,नवदिप सैनी,मोहम्मद सिराज,मोईन अली,पार्थिव पटेल,पवन नेगी,गुरकिरत सिंग मान,देवदत्त पडिकल,इसरु उदाना,डेल स्टेन,ख्रिस मॉरिस,पवन देशपांडे,जोशुआ फिलिप्स,शाहबाज अहमद
सर्वोत्तम कामगिरी – २००९, २०११ आणि २०१६ (उपविजेतेपद)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply