आयपीएलच्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवल्यानंतर राजस्थानला पुढील ११ वर्षांत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. शेन वॉर्न, राहुल द्रविड, शेन वॉटसन,स्टिव्ह स्मिथ व अजिंक्य रहाणे यांसारख्या तगड्या खेळाडुंनी राजस्थानचे नेतृत्व केले आहे पण अजुनही राजस्थानचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलेला नाही.अनुभवासोबतच नवख्या खेळाडुंची राजस्थान संघाने नेहमीच चांगल्याप्रकारे सांगड घातली आहे त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा राजस्थानने यशस्वी जैस्वाल व कार्तिक त्यागी यांसारख्या नवख्या खेळाडुंना संधी दिली आहे
राजस्थानने लिलाव प्रकियेत उथ्थपा, डेविड मिलर यांसारख्या अनुभवी तर यशस्वी जैस्वाल,कार्तिक त्यागी यांसारख्या नवख्या खेळाडुंना संघात सामावुन घेतले आहे.तसेच राजस्थानने अजिंक्य रहाणे,धवल कुलकर्णी व कृष्णप्पा गौतमच्या जागी मयंक मार्कंडे,अंकित राजपुत व राहुल तेवाटियाला ट्रेड मध्ये आपल्या संघात घेतले आहे.पण राजस्थानला अजिंक्य रहाणेच्या अनुभवाची कमतरता जाणवेल हे मात्र नक्की. संघाची फलंदाजी जबरदस्त आहे पण गोलंदाजीत संघ काहीसा कमजोर दिसत आहे.
दिल्ली संघाने अजिंक्य रहाणेला आपल्या संघात सामावुन घेतल्यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत तसेच लिस्ट ए मध्ये धडाकेबाज कामगिरी केलेल्या यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या जोस बटलरसोबत सलामीला आला तर नवल वाटायला नको.तसेच त्याच्या फलंदाजी बरोबरच त्याची गोलंदाजीसुद्धा संघासाठी महत्त्वाची ठरेल. संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी स्मिथ, बटलर, स्टोक्स, उथप्पा व सॅमसनवर असेल तर गोलंदाजीची धुरा आर्चर,उनाडकट,श्रेयस गोपाल व अंकित राजपुतवर असेल.स्टोक्सने काही वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमधुन माघार घेतली होती त्यामुळे तो जर आयपीएलमध्ये सहाभागी नाही झाला तर तो राजस्थान साठी मोठा धक्का असेल.तसेच डेविड मिलर सारखा तगडा फलंदाज संघात असुन देखिल त्याला संघाबाहेरच राहावे लागेल असे दिसते.
सर्वोत्तम ११ – स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजु सॅमसन, बेन स्टोक्स, रियान पराग, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, अंकित राजपुत
राजस्थान रॉयल्स – स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, संजु सॅमसन,रॉबिन उथप्पा,डेविड मिलर, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, वरुण ऍरॉन, शशांक सिंग, महिपाल लोमरोर, मयंक मार्कंडे, मनन वोहरा, रियान पराग,श्रेयस गोपाल,राहुल तेवाटीया, अंकित राजपुत,जयदेव उनाडकट,कार्तिक त्यागी,आकाश सिंग,ओशेन थॉमस, अॅड्र्यु टाय,यशस्वी जैस्वाल,अनिरुद्ध जोशी,अनुज रावत,टॉम करन
सर्वोत्तम कामगिरी – २००८ (विजेतेपद)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply