२०१९ च्या सत्रात रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.पण यावेळेस पंजाबचा संघ नवीन कर्णधार के एल राहुलच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच पंजाबने मुख्य प्रशिक्षक म्हणुन अनिल कुंबळेची नेमणुक केली आहे त्यामुळे राहुल व कुंबळेची जोडी कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ च्या सत्रातील सुरुवातीचे काही सामने युएई मध्ये खेळविण्यात आले होते त्या सर्व ५ सामन्यांत पंजाबने विजय मिळवला होता आणि त्याच सत्रात पहिल्यांदा पंजाबने अंतिम सामन्यांत धडक मारली होती पण त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. यावेळेस संपुर्ण सत्र युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे त्यात पंजाबचा संघ कशी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष्य नक्कीच असेल.
मागच्या सत्रात २०१९ मध्ये संघाचे नेतृत्व केलेल्या अश्विन यावेळेस दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद शमी करताना दिसेल. तसेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणाऱ्या राहुलची चांगलीच परीक्षा असणार आहे त्यात अश्विनला दिल्ली संघात सामावुन घेतल्याने पंजाबची गोलंदाजी काहीशी कमजोर झाली आहे.कर्णधारपद,फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणात शानदार कामगिरी करण्यास राहुल उत्सुक असणार हे मात्र नक्की.तसंच फलंदाजांपैकी पुरन व मॅक्सवेल सामने खेळुन आयपीएल मध्ये सहभागी होणार आहेत ही पंजाबसाठी जमेची बाजू आहे.
पंजाबच्या संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीत राहुल, गेल,आगरवाल,मॅक्सवेल व पुरन यांसारख्या तगड्या खेळाडुंचा भरणा आहे त्यामुळे विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा असणार आहे.तसेच कृष्णप्पा गौतमच्या रुपाने अष्टपैलु खेळाडु आहे.तसं पाहिलं तर पंजाबची गोलंदाजी काहीशी कमजोर दिसत आहे.त्यात गोलंदाजीत कॉट्रेल,मुजीब व ख्रिस जॉर्डन पैकी एकाच संधी मिळू शकते.
सर्वोत्तम ११- के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पुरन,मनदिप सिंग, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल/ख्रिस जॉर्डन, इशान पोरेल, मुजीब उर रहेमान
किंग्स इलेव्हन पंजाब –के एल राहुल (कर्णधार), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पुरन, मुजीब उर रहेमान, ख्रिस गेल, मनदिप सिंग, मयंक आगरवाल, हर्डस विल्जोन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, हरफ्रित ब्रार, मुर्गन अश्विन, जगदिश सुचित, कृष्णप्पा गौतम, शेल्डन कॉट्रेल, इशान पोरेल, रवि बिश्नोई, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स निशम, ख्रिस जॉर्डन, दिपक हुड्डा, तजिंदर सिंग धिल्लन, प्रभसिमरन सिंग
सर्वोत्तम कामगिरी – २०१४ (उपविजेतेपद)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply