२०१२ व २०१४ मध्ये गोतम गंभीरच्या नेतृत्वात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. सुनिल नारायण, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, कुलदिप यादव आणि नितीश राणा यांसारख्या तगड्या खेळाडुंचा समावेश असलेल्या कोलकत्ता संघ आपले तिसरे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल यात शंका नाही.तसेच सीपीएल मध्ये ब्रॅंडन मॅक्युलमच्या प्रशिक्षणात त्रिनबागो नाईट रायडर्सने आपले ४ थे विजेतेपद पटकावले आहे तश्याच कामगिरीची अपेक्षा कोलकत्ता संघाच्या समर्थकांना असेल.
इयॉन मॉर्गन, टॉम बॅंटन व पॅट कमिन्सला संघात सामावुन घेत फलंदाजीसोबतच गोलंदाजीतील ताकद वाढवली आहे.भारतीय खेळाडुंसोबतच परदेशी खेळाडुंचा भरणा असलेल्या कोलकत्ता संघाने प्रत्येक क्षेत्रात समतोल राखला आहे. कोलकत्ता संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे सुनिल नारायण, आंद्रे रसेल, इयॉन मॉर्गन, टॉम बॅंटन व पॅट कमिन्स हे सीपीएल तसेच इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या मालिकेचा भाग होते त्यामुळे त्यांच्यावर संघाची मदार असेल तसेच अनुभवी खेळाडुंसोबत युवा खेळाडुंना देखिल संघात सामील करुन घेतले आहे.
कोलकत्ता संघ कागदावर तर तगडा वाटत आहे. सुनिल नारायण, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल व पॅट कमिन्स हेच चार परदेशी खेळाडु जास्तीत जास्त सामने खेळताना दिसतील. शुभमन गिल, मॉर्गन, नितीश राणा, कार्तिक व रसेलवर फलंदाजीची तर कमिन्स, कुलदिप, नागरकोटी, नारायणवर गोलंदाजी मदार असेल.दर्जेदार फलंदाचा भरणा असलेल्या संघात एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या आंद्रे रसेल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष्य असेल.
सर्वोत्तम ११ – दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनिल नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, कुलदिप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद कृष्णा, कमलेश नागरकोटी
कोलकत्ता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनिल नारायण, आंद्रे रसेल, कुलदिप यादव, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, शुभमन गिल, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, लॉकी फर्गुसन, रिंकु सिंग, प्रसिद कृष्णा, संदिप वॉरियर, सिद्धेश लाड, वरुण चक्रवर्ती, टॉम बॅंटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रिन, एम सिद्धार्थ, अली खान, निखिल नाईक
सर्वोत्तम कामगिरी – २०१२ व २०१४ विजेतेपद
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply