२०१६ च्या सत्रात विजेतेपद तर २०१८ च्या सत्रात उपविजेते पटकावलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंका नाही.तसेच मागील चार सत्रात पहिल्या चार क्रमांकामध्ये राहिलेला सनरायझर्स हैद्राबाद एकमेव संघ आहे त्यामुळे आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास संघ उत्सुक असेल यात काही शंका नाही. वॉर्नर,बेअरस्टो,नबी व राशिद खान सामने खेळुन आयपीएल मध्ये सहभागी होणार आहेत ही संघासाठी जमेची बाजू आहे.
सनरायझर्स हैद्राबाद संघाने लिलाव प्रक्रियेत २०२० च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या प्रियम गर्गला आपल्या संघात सामावुन घेतले आहे.गर्ग सोबतच हैद्राबाद संघाने विराट सिंग,फॅबियन ऍलन,मिशेल मार्शचा संघात समावेश करत मधली फळी मजबुत करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे युवा खेळाडुंच्या कामगिरीवर सुद्धा सर्वांची नजर असेल.
सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधारडेविड वार्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन व मनिष पांडे यांच्यावर तर गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार,राशिद खान,सिद्धार्थ कौलवर असेल.एकीकडे संघाची वरची फळी जबरदस्त आहे पण मधल्या फळी काहीशी कमजोर वाटते.त्यामुळे सीपीएल २०२० मध्ये अष्टपैलु कामगिरी करणारा मोहम्मद नबी केन विल्यमसनच्या जागी चौथा परदेशी खेळाडु खेळला तर नवल वाटायला नको.नबी मध्ये शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्याची कला आहे तसेच तो पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करुन विरोधी संघावर दबाव निर्णाण करु शकतो.
सर्वोत्तम ११ – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा, खलिल अहमद, शादाब नदिम
संघ – डेविड वार्नर (कर्णधार), केन विल्यमसन, मनिष पांडे, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, शादाब नदिम,विजय शंकर, खलिल अहमद,संदिप शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान साहा, मोहम्मद नबी, श्रीवत्स गोस्वामी, अभिषेक शर्मा, विराट सिंग, बिली स्टॅंलेक, टी नटराजन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, संजय यादव, बावंका संदिप, बासिल थंपी, मिशेल मार्श, फॅबियन ऍलन
सर्वोत्तम कामगिरी – २०१६ (विजेतेपद)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply