२००८ व २००९ मध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतरही दिल्लीचा संघ मागील १२ वर्षांत अंतिम फेरी गाठु शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात २०१९ च्या सत्रात पहिल्या चार संघात प्रवेश मिळवला होता. पण दिल्लीला क्वालिफायर-२ मध्ये चेन्नई सुपरकिंग विरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ आपले पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरेल यात शंका नाही.
युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या संघात अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉयनिस व शिमरॉन हेटमायर यांसारख्या तगड्या खेळाडुंचा संघात समावेश करत दिल्लीने संघाला आणखीन मजबुती दिली आहे.तसे पाहिले मागच्या सत्रात श्रेयस अय्यर, रिषभ पंत,शिखर धवन व पृथ्वी शॉने फलंदाजीची तर कमान कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अमित मिश्रा व संदिप लामिछानेने गोलंदाजीची धुरा सांभाळली होती.
श्रेयस अय्यर, शिखर धवन व पृथ्वी शॉ सारखे वरच्या फळीत खेळणारे फलंदाज संघात असल्याने अजिंक्य रहाणेला वरच्या फळीत वा संघात खेळण्याची संधी कमीच मिळण्याची शक्यता दिसत आहे पण रहाणे एका नव्या भुमिकेत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.वरच्या फळीतील तगड्या फलंदाजांसोबतच हेटमायर व स्टॉयनिसवर मोठी जिम्मेदारी असेल तर अश्विन, रबाडा, इशांत, मिश्रा व मोहित शर्मावर गोलंदाजीची धुरा असेल.संघात कोणत्या चार परदेशी खेळाडुंना संधी मिळते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष्य असेल.
सर्वोत्तम ११ – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मोहित शर्मा/संदिप लामिछाने
दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, अवेश खा न,किमो पॉल, हर्षल पटेल,संदिप लामिछाने,मोहित शर्मा,ललित यादव,मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी,शिमरॉन हेटमायर,तुषार देशपांडे
सर्वोत्तम कामगिरी – २००८ आणि २००९ (उपांत्य फेरी)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply