२०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद तर तब्बल ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघ विजेतेपदांमध्ये मुंबई संघाची बरोबरी करण्यास उत्सुक असेल. युएई मध्ये झालेल्या २०१४ च्या सत्रात चेन्नईची शानदार कामगिरी केली होती.मागील दोन सत्रात अनुक्रमे विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावणारा चेन्नईचा संघाच्या कामगिरीवर क्रिकेट रसिकांचे लक्ष्य असेल.
आयपीएलचे १३ वे सत्र सुरु होणापुर्वीच सुरेश रैना व हरभजन सिंगने या सत्रातुन माघार घेतली आहे हा चेन्नई संघासोबतच क्रिकेट रसिकांसाठी मोठा धक्का होता.रैना व हरभजनची उणिव चेन्नई संघाला जाणवेल यात काही शंका नाही.रैनाच्या अनुपस्थितीत युवा ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्याता नाकारता येत नाही पण रैनाची उणिव भरुन काढणे तितकेसे सोपे असणार नाही. तसेच कोलकत्ता संघासाठी शानदार कामगिरी केलेल्या पियुष चावला संघात सामावुन घेत चेन्नई संघाने गोलंदाजीत आपली ताकद वाढवली आहे.
रैनाच्या अनुपस्थितीमुळे फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार महेंद्र सिंग धोनी, शेन वॉटसन, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस व केदार जाधववर तर गोलंदाजी मदार असेल ती ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर, पियुष चावला व रविंद्र जडेजावर.तसेच रैनाच्या अनुपस्थितीत धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीवर येईल हे पाहावे लागेल.
सर्वोत्तम ११ – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर, पियुष चावला
संघ – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार),केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, अंबाती रायडु, मुरली विजय, फाफ ड्यु प्लेसिस, इम्रान ताहिर, दिपक चहर, लुंगी एन्गीडी, मिशेल सॅंटनर, के एम असीफ, जगदिशन नारायण, मोनु सिंग, ऋतुराज गायकवाड, जोश हॅजेलवुड, पियुष चावला, सॅम करन, साई किशोरे
सर्वोत्तम कामगिरी – २०१०, २०११ आणि २०१८ (विजेतेपद)
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply