२०१३,२०१५,२०१७ व २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद राखण्यास मैदानात उतरणार आहे.यावेळेस संपुर्ण स्पर्धा युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे पण २०१४ मध्ये युएई मध्ये स्पर्धेचे सुरुवातीचे काही सामने खेळवण्यात आले होते त्यात मुंबईने आपले पाचही सामने गमावले होते त्यामुळे युएईमधील आपली कामगिरी सुधारण्यासही मुंबईचा संघ उत्सुक असेल.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या लसिथ मलिंगाने काही वैयक्तिक कारणांमुळे या सत्रातुन माघार घेतली आहे हा मुंबई संघासाठी मोठा धक्का बसला आहे. मलिंगाच्या जागी मुंबईने जेम्स पॅटिन्सनची निवड केली आहे पण मलिंगाची कमतरता नक्कीच जाणवेल. मुंबईने यावेळेस ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन यांसारख्या तगड्या खेळाडुंना संघात सामावुन घेत मुंबईने फलंदाजी सोबतच गोलंदाजीत ताकद वाढवली आहे.
मुंबईच्या संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार रोहित शर्मा,क्विंटन डी कॉक,सुर्यकुमार यादव, ख्रिस लीन,इशान किशन, हार्दिक पंड्या व किरॉन पोलार्डवर असेल तर गोलंदाजीची धुरा जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट,धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईल, मिशेल मॅक्लेनाघन, क्रुणाल पंड्या व राहुल चहरवर असेल. ट्रेंट बोल्टच्या समावेशामुळे मुंबईची गोलंदाजी आणखीन भक्कम झाली आहे.संघात चारच परदेशी खेळाडुंना संधी मिळु शकते त्यामुळे क्विंटन डी कॉक,किरॉन पोलार्ड,ट्रेंट बोल्ट
सर्वोत्तम ११ – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल/मिशेल मॅक्लेनाघन
संघ- रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड,हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, ख्रिस लिन, इशान किशन, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल,राहुल चहर,धवल कुलकर्णी, मिशेल मॅक्लेनाघन, अनमोलप्रित सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकुल रॉय, शेर्फन रुदरफोर्ड, जेम्स पॅटिन्सन, सौरभ तिवारी,मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंग, दिग्विजय देशमुख
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply