२०१९ च्या सत्रातील विजेता आणि उपविजेता मध्ये आयपीएल २०२० चा पहिला सामना अबुधाबी मध्ये रंगणार आहे.आयपीएल इतिहासातील दोन सर्वोत्कृष्ट संघातील सामन्यांने आयपीएल २०२० च्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे मार्च मध्ये सुरु होणारी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता संपुर्ण स्पर्धाच युएई मधील अबुधाबी,शारजा आणि दुबई मध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळविण्यात येणार आहे.
मुंबई व चेन्नई संघाचा विचार करता मुंबई संघ नेहमीच वरचढ ठरला आहे.आयपीएल व चॅम्पियन लिग मध्ये मुंबई व चेन्नईचा संघ ३० वेळेस भिडले आहेत त्यात मुंबईने १८ वेळेस तर चेन्नईने १२ वेळेस विजय मिळवला आहे.महत्त्वाची बाब म्हणजे मागील ५ सामन्यांत चेन्नई संघाला पराभव स्विकारावा लागला आहे.त्यामुळे मुंबईचा संघ चेन्नई विरुद्धची विजयी घोडदौड कायम ठेवतो की चेन्नई नव्या सत्राची सुरुवात विजयाने करते हे पाहावे लागेल.
दोन्ही संघांचा विचार करता मुंबईचा संघ फिरकी गोलंदाजांत अनुभवी गोलंदाजाची कमतरता जाणवते पण राहुल चहर व क्रुणाल पंड्यानेच २०१९ च्या सत्रात शानदार कामगिरी केली होती हे विसरता येणार नाही. तर दुसरीकडे चेन्नईचा संघ फलंदाजीत काहीसा कमजोर वाटत आहे.रैनाच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई संघात पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती पोकळी भरुन काढण्याची जिम्मेदारी ड्यु प्लेसिस,केदार जाधव,रविंद्र जडेजा व ब्राव्होवर असेल.ट्रेंट बोल्टच्या येण्याने मुंबईची गोलंदाजी आणखीन भक्कम झाली आहे तर चेन्नईचा संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे.
संभावित संघ
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल/मिशेल मॅक्लेनाघन
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर, पियुष चावला
ड्रीम संघ – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, महेंद्र सिंग धोनी, शेन वॉटसन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ड्वेन ब्राव्हो, दिपक चहर, पियुष चावला, राहुल चहर, जसप्रित बुमराह
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply