रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व सुपर ओव्हर मध्ये मुंबईवर विजय मिळवत पंजाबने सलग दोन विजय मिळवले आहेत तर दुसरीकडे गुणतालिकेत दिल्लीचा संघ अग्रस्थानी आहे. त्यामुळे सामना जबरदस्त होईल यात शंका नाही.दिल्लीने आपले प्ले ऑफ मधील स्थान जवळपास निश्चित केले आहे तर पंजाबचा संघ ६ गुणांसह ७ व्या स्थानी आहे त्यामुळे पंजाब संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पंजाबला प्रत्येक सामन्यांत विजय आवश्यक आहे त्यासोबतच त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष्य ठेवावे लागेल हे मात्र निश्चित.
दिल्ली संघाचा विचार करता फलंदाजां सोबतच गोलंदाजांनी कामगिरीत सातत्य राखले आहे.दिल्लीच्या फलंदाजीची मदार कर्णधार श्रेयस अय्यर,शिखर धवन,पृथ्वी शॉ व मार्कस स्टॉयनिसवर तर गोलंदाजीती मदार कागिसो रबाडा, नॉर्खिया, रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेलवर असेल. मागील ३ सामन्यांत शिखरने नाबाद ६९,५७ व नाबाद १०१ धावा केल्या आहेत तश्याच कामगिरीची अपेक्षा दिल्ली संघाला शिखर कडुन असेल. रिषभ पंत तंदरुस्त असेल तर अजिंक्य रहाणेच्या जागी त्याचा संघात समावेश होऊ शकतो.
आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत कर्णधार के एल राहुल व मयंक अगरवाल पहिल्या दोन क्रमांकावर आहेत पण त्यांना इतर फलंदाज व गोलंदाजांकडुन साथ मिळाली नाही.त्यामुळे पंजाबचा संघ अजुनही ७ व्या क्रमांकावर आहे.पंजाब संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी के एल राहुल,मयंक, ख्रिस गेल व निकोल्स पुरनवर तर गोलंदाजीची मदार मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन व रवि बिश्नोईवर असेल.आयपीएल २०२० मध्ये दिल्ली व पंजाब मधील पहिल्या सामन्यांचा निकाल सुपर ओव्हर मध्ये लागला होता त्यात दिल्लीने विजय मिळवला होता त्याचा बदला घेण्यास पंजाबचा संघ उत्सुक असेल हे मात्र नक्की.
संभावित संघ-
दिल्ली कॅपिटल्स :- श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी, तुषार देशपांडे, अॅन्रिक नॉर्खिया
किंग्स ११ पंजाब :- के एल राहुल (कर्णधार), मोहम्मद शमी, निकोलस पुरन, ख्रिस गेल,मयंक आगरवाल, हरफ्रित ब्रार, मुर्गन अश्विन, रवि बिश्नोई, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन, दिपक हुड्डा
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply