आयपीएल २०२० मधील ५० सामने झाल्यानंतरही आतापर्यंत मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे एकवेळ गुणतालीकेत अग्रस्थानी असलेला दिल्लीचा संघ प्ले ऑफ मध्ये सहज प्रवेश मिळवेल असे दिसत असताना दिल्लीला मागील ३ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे तसेच सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध ८८ धावांनी पराभव झाल्याने दिल्ली संघाचा नेट रनरेटवर चांगलाच परिणाम झाला आहे. दिल्लीला उर्वरित दोन सामन्यांपैकी एका सामन्यांत विजय आवश्यक आहे.महत्त्वाचे म्हणजे उर्वरित सामने मुंबई व बेगलोर विरुद्ध आहेत त्यामुळे दिल्ली संघासाठी प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपली कामगिरी उंचवावी लागेल.
मुंबई संघाचा विचार करता दुखापतीमुळे रोहित शर्मा मागील तीन सामन्यांत संघाचा भाग राहिलेला नाही आणि रोहितच्या अनुपस्थित किरॉन पोलार्डने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.दिल्ली विरुद्धच्या सामन्यांत सुद्धा रोहित खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे फलंदाजीची जबाबदारी क्विंटन डी कॉक,सुर्यकुमार यादव,इशान किशन,हार्दिक पंड्या व किरॉन पोलार्डवर तर गोलंदाजीची धुरा जसप्रित बुमराह,ट्रेट बोल्ट,पॅटिनसन व राहुल चहरवर असेल.प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवल्यामुळे मुंबई संघाचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही आणि दिल्ली विरुद्ध विजय मिळवून मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांतील आपले स्थान निश्चित करण्यास उत्सुक असेल.
चांगल्या सुरुवातीनंतर मागील ३ सामन्यांपासुन दिल्ली संघाची लय बिघडली आहे. शानदार लयीत असणाऱ्या शिखर धवनला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळताना दिसत नाही त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या जागी पृथ्वी शॉला संघात सामावुन घेतले जाऊ शकते. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिसवर फलंदाजीची तर कागिसो रबाडा, नॉर्खिया, रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेलवर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल. महत्त्त्वाचे म्हणजे या सत्रातील पहिल्या सामन्यांत दिल्लीला मुंबईविरुद्ध ५ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला होता त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यास दिल्लाचा संघ उत्सुक असेल यात शंका नाही.
दिल्ली कॅपिटल्स :- श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, हर्षल पटेल, ऐन्रिक नॉर्खिया
मुंबई इंडियन्स :- किरॉन पोलार्ड (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply