भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका जबरदस्त होईल असेच वाटत होते पण ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलियाने तिन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजयी आघाडी घेतल्याने यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ व्हाईटवॉश देण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे भारतीय संघ मालिकेतील शेवटच्या व तीसऱ्या सामन्यांत विजय मिळवून व्हाईटवॉश रोखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल हे मात्र नक्की.
ऑस्ट्रेलिया संघाचा विचार पहिल्या दोन्ही सामन्यांत स्टिव्ह स्मिथ, कर्णधार फिंच, डेविड वॉर्नर व मॅक्सवेलने शानदार फलंदाजी करत भारतीय संघासमोर भलेमोठे आव्हान ठेवले होते.ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला होता.फलंदाजां पाठोपाठ झंपा, कमिन्स व हॅजेलवुडने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना रोखले होते.दुसऱ्या सामन्यांत झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नर तीसऱ्या एकदिवसीय सामन्यांत व टी-२० मालिकेत खेळु शकणार नाही तर कमिन्सला तीसऱ्या एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत होता पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती त्यामुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते.पहिल्या सामन्यांत हार्दिक व धवनने तर दुसऱ्या सामन्यांत विराट व राहुलने शानदार खेळी केल्या पण त्यांना दुसऱ्या बाजुने साथ मिळाली नव्हती.आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केलेल्या पण पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या मयंकला पुढील सामन्यांत संधी मिळेल का हे पाहावे लागेल तसेच पहिल्या दोन सामन्यांत सपशेल अपयशी ठरलेल्या चहलच्या जागी कुलदिप यादवची वर्णी लागु शकते.
संभावित संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मयंक अगरवाल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदिप यादव, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, टी नटराजन
ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यु वेड, मार्नस लॅबुशाने, स्टिव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईझेस हेन्रिक्स, अॅलेक्स कॅरी, अॅण्ड्र्यु टाय, अॅडम झंपा, मिशेल स्टार्क, जोश हेजेलवुड
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply