कोण घेणार मालिकेत आघाडी?

युएई मध्ये आयपीएल २०२० यशस्वीरित्या पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव स्विकारावा लागला आहे.एकदिवसीय मालिकेतील तीसऱ्या व शेवटच्या सामन्यांत १३ धावांनी विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नाही त्यामुळे टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ विजयाने करण्यास उत्सुक असेल तर दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाची नजर एकदिवसीय मालिकेसोबतच टी-२० मालिका विजयावर असेल.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्यावर असेल.तसेच रोहितच्या अनुपस्थित धवन-राहुल या सलामी जोडीवर भारतीय संघाची मोठी मदार असेल यात शंका नाही तसेच कोहली व हार्दिकचा सध्याचा फॉर्म महत्त्वाचा ठरेल. मधल्या फळीची जिम्मेदारी मनिष पांडे व श्रेयस अय्यरवर असेल तर गोलंदाजीची मदार बुमराह, शमी, कुलदिप व जडेजावर असेल. आपल्या पदार्पणाच्या सामन्यांत शानदार गोलंदाजी केलेल्या टी नटराजनला टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळु शकते.

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला तगडा संघ जाहीर केला आहे. अॅरॉन फिंचच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी फिंच, लॅबुशाने, स्मिथवर तर गोलंदाजीची जिम्मेदारी स्टार्क,झंपा व हॅजेलवुडवर असेल. तसेच अष्टपैलु मॅक्सवेल व हेन्रिक्स आपले योगदान देण्यास उत्सुक असतील.मॅक्सवेलसाठी २०२० आयपीएल निराशाजनक राहिली असली तरी एकदिवसीय मालिकेत शानदार फलंदाजी केल्याने त्याला रोखणे महत्त्वाचे आहे. वॉर्नर व कमिन्सच्या अनुपस्थितीत मॅथ्यु वेड व एस्टम अगारला संघात स्थान मिळू शकेल. संभावित संघ

भारत- विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदिप यादव, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, टी नटराजन/दिपक चहर

ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यु वेड, मार्नस लॅबुशाने, स्टिव्हन स्मिथ, मोईझेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी,एस्टन अगार, अॅडम झंपा, मिशेल स्टार्क, जोश हेजेलवुड

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: