एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघ बॉर्डर-गावसकर मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासुन ऍडलेड येथे सुरुवात होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्यापासुन सुरु होणारा पहिला सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार आहे.भारतीय संघ पहिल्यांदाच विदेशी भुमिवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे त्यामुळे भारतीय संघाचा कस लागणार हे मात्र नक्की आहे.
कसोटी मालिकेपुर्वी भारतीय संघाने दोन सामने खेळले त्यातील एक सामना दिवस-रात्र खेळविण्यात आला होता त्यामुळे भारतीय खेळाडुंना मदत मिळाली असेल. दोन्ही सराव सामन्यांत अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ कडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार असेल ती कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयंक अगरवाल व हनुमा विहारीवर तर गोलंदाजीची मदार जसप्रित बुमराह, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी व उमेश यादववर असेल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचा विचार करता ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्याचा अनुभव जास्त आहे त्यात त्यांची कामगिरी सुद्धा शानदार राहिली आहे.दुखापतीमुळे डेविड वॉर्नर पहिल्या सामन्यांत खेळु शकणार नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची मदार स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, जो बर्न्स व ट्रेविस हेडवर तर मिशेल स्टार्क,पॅट कमिन्स, जोश हेझेलवुड व नॅथन लायनवर गोलंदाजीची मदार असेल.सराव सामन्यांत अष्टपैलु कामगिरी केलेल्या कॅमरुन ग्रिनला पदार्पणाची संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. दोन्ही संघ मालिकेची विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक असतील त्यामुळे पहिला सामना दोघांसाठी महत्त्वाचा असेल हे मात्र नक्की.
भारतीय संघ- विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ- टिम पेन(कर्णधार), पॅट कमिन्स(उपकर्णधार), स्टिव्ह स्मिथ, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशाने, जो बर्न्स, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रिन, मिशेल स्टार्क, जोश हेझेलवुड, नॅथन लायन
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply