विश्वविजेता इंग्लंड संघावर भारी पडणार का विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ?

कसोटी मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कसोटी आणि टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे यात काही शंका नाही.त्याच आत्मविश्वासाच्या बळावर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरेल हे मात्र नक्की. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे (गहुंजे) येथे २३ ते २८ मार्च दरम्यान खेळविण्यात येणार आहे. कसोटी व टी-२० मालिकेत आघाडी घेतल्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागल्याने इंग्लंड संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

भारतीय संघाचा विचारकरता टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव तसेच विजय हजारे चषकात शानदार प्रदर्शन करणाऱ्या कृणाल पंड्या व प्रसिद्ध कुष्णाला संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे.त्यातच टी-२० मालिकेत पुर्णपणे अपयशी ठरणाऱ्या के एल राहुलला संधी मिळते की सध्या पुर्णपणे लयीत असणाऱ्या रिषभ पंतलाच यष्टिरक्षणाची संधी मिळते हे पाहावे लागेल.भारतीय संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी असेल ती विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन,श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्यावर तर रविंद्र जडेजा व जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची धुरा असेल ती भुवनेश्वर कुमार,यजुवेंद्र चहल व शार्दुल ठाकुरवर.त्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसहच मैदानात उतरतो की कृणाल पंड्याला संधी देऊन सहावा गोलंदाजासह फलंदाजीत एक पर्याय होवु शकतो.

इंग्लंडने कसोटी कर्णधार जो रुटला संघात स्थान दिलेले नाही तर दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरने मालिकेतुन माघार घेतली आहे त्यामुळे फलंदाजीची जिम्मेदारी मॉर्गन, बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स व बटलरवर असेल तर आर्चरच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या गोलंदाजीची जिम्मेदारी मार्क वुड, आदिल राशिद व सॅम करनवर आली आहे. रुट संघात नसल्याने मधल्या फळीत इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.महत्त्वाचे म्हणजे ज्या लयीत विश्वविजेता इंग्लंडचा संघ मागील तीन-चार वर्षांपासुन एकदिवसीय सामन्यांत खेळत आहे ते पाहता हि मालिका भारतीय संघासाठी सोपी नसणार हे मात्र नक्की.तसे पाहिले तर मालिकेत मोठी धावसंख्या उभारल्या जाऊ शकतात त्यामुळे गोलंदाजांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

संभावित संघ

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, के एल राहुल/ रिषभ पंत, सुर्यकुमार यादव/कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, टी नटराजन

इंग्लंड संघ- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन/ सॅम बिलिंग, टॉम करन/मोईन अली, सॅम करन, मार्क वुड, आदिल राशिद, रिस टोपली

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: