युवा रिषभ पंतच्या गळ्यात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यांत क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला ९ एप्रिल पासुन सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ मधुन माघार घ्यावी लागली.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने मागील दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला होता त्यातील २०२० च्या युएई मध्ये झालेल्या आयपीएल मध्ये दिल्लीने अंतिम फेरी पर्यंत मजल मारली होती पण त्यांना मुंबई इंडियन्सकडुन पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते त्यात अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, रिषभ पंत व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथसारखे पर्याय उपलब्ध होते त्यात दिल्लीने युवा रिषभ पंतची निवड केली आहे.

ऑस्टेलिया दौऱ्यात रिषभ पंतने शानदार कामगिरी करत मालिका विजयात महत्त्वाची भुमिका बजावली होती तसेच त्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सुद्धा त्याची कामगिरी शानदार राहिली आहे.त्यामुळे अजिंक्य रहाणे,रविचंद्रन अश्विन व स्टिव्ह स्मिथच्या जागी युवा रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे. २०२० चे आयपीएल सत्र रिषभसाठी तितकेसे  चांगले ठरले नव्हते तसेच दुखापतीमुळे काही सामने तो संघाबाहेर राहिला होता. २०२० च्या सत्रात त्याला १४ सामन्यांत १ अर्धशतकासह ११३.९५ च्या स्ट्राईक रेटने ३४३ धावा करता आल्या होत्या.सध्याची रिषभची कामगिरी पाहता तो कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल आणि फलंदाजीतील कामगिरी त्याला कर्णधारपद सांभाळण्यास देखिल महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.

रिषभ २०१६ च्या सत्रापासुन दिल्ली संघाचा भाग राहिला आहे.रिषभ पंतच्या आयपीएल कामगिरीवर एक नजर टाकली तर रिषभने आतापर्यंत ६८ सामन्यांत १ शतक व १२ अर्धशतकाच्या सहाय्याने तब्बल १५१.९७ च्या स्ट्राईक रेटने २०७९ धावा फटकावल्या आहेत त्यात नाबाद १२८ ही त्याची आयपीएल मधील सर्वोत्तम खेळी आहे.आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार करता २०१८ चे सत्र रिषभ पंत साठी सर्वोत्तम ठरले त्यात १४ सामन्यांत त्याने ५२.६१ च्या सरासरीने तब्बल ६८४ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे कर्णधारपदासोबतच रिषभच्या फलंदाजातील कामगिरीवर सर्वांची नजर असेल हे मात्र नक्की. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० एप्रिलला तीन वेळचा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चैन्नई सुपर किगंविरुद्धच्या सामन्याने आपल्या आयपीएल २०२१ सत्राची सुरुवात करणार आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: