श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोणाच्या गळ्यात पडणार दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ?

आयपीएल २०२० सत्राचा उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२१ सत्रापुर्वीच मोठा धक्का बसला आहे.आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात ९ एप्रिलला होणार आहे पण भारत-इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यामुळे अय्यरच्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे.हा दिल्ली संघासाठी मोठा धक्का आहे आता या सत्रात दिल्ली संघाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मागील दोन सत्रात दिल्लीने अय्यरच्या नेतृत्वात प्ले ऑफ मध्ये स्थान पटकावले होते त्यामुळे दिल्लीला अय्यरची कमतरता जाणवेल यात शंका नाही. अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधार सांभाळण्यास दिल्ली संघाकडे अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन,शिखर धवन, रिषभ पंत, पृथ्वी शॉ व स्टिव्हन स्मिथ सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

१) अजिंक्य रहाणे- मुंबईकर अजिंक्य रहाणेनी यापुर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले आहे तसेच रहाणेचा अनुभव दिल्ली संघासाठी महत्त्वाचा राहु शकतो.पण महत्त्वाची बाब म्हणजे रहाणे सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघाचा भाग नाही हीच गोष्ट रहाणेला नेतृत्व सोपवण्यास अडचण येऊ शकते.

२) रविचंद्रन अश्विन- २०१८ व २०१९ च्या सत्रात अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले आहे पण त्याच्या नेतृत्वात संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही.२०२० च्या सत्रात दिल्ली संघाने अश्विनला आपल्या ताफ्यात घेतले होते पण तो सुद्धा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नाही त्यामुळे दिल्ली संघाची जिम्मेदारी अनुभवी अश्विनच्या खांद्यावर येते का हे पाहावे लागेल.

३) शिखर धवन- मागील काही वर्षांत धवनने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे तसेच २०२० च्या आयपीएलमध्ये धवनने शानदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरी गाठण्यात महत्त्वाची भुमिका निभावली होती.तसेच यापुर्वी धवनने सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व केले आहे त्यामुळे अय्यरच्या अनुपस्थितीत धवन सुद्धा कर्णधारपदाचा दावेदार आहे.

४) रिषभ पंत- श्रेयस अय्यरच्या उपस्थितीत संघाचे उपकर्णधार पद सांभाळणाऱ्या युवा रिषभ पंत ही अय्यरच्या उपस्थितीत संघाचे नेतृत्व करु शकतो.युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या संघाचे नेतृत्व युवा खेळाडुकडे सुद्धा दिले जाऊ शकते. तसेच सध्याची रिषभ पंतची कामगिरी पाहता रिषभ त्याच आत्मविश्वासाने संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतो.

५) पृश्वी शॉ- २०१८ चा १९ वर्षाखालील विश्वचषक तसेच शॉने आपल्या नेतृत्वात मुंबई संघाला २०२१ चा विजय हजारे चषक जिंकुन दिला आहे.पृथ्वी शॉने आपल्या कामगिरीसोबतच संघाचे देखिल शानदार नेतृत्व केले आहे.२०२० च्या आयपीएल मध्ये पृथ्वीला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती पण सध्याची त्याची कामगिरी पाहता अय्यरच्या अनुपस्थितीत तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडु असेल यात शंक नसेल.

६) स्टिव्हन स्मिथ- स्टिव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार राहिला आहे पण बॉल टॅंम्परिंगमुळे त्याला कर्णधारपद सोडावे लागले होते. त्यासोबतच यापुर्वी स्मिथने राजस्थान रॉयल्स व पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे पण राजस्थान रॉयल्स संघाने स्मिथला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर दिल्लीने स्मिथला आपल्या ताफ्यात घेतले आहे त्यामुळे एक अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडुच्या खांद्यावर कर्णधारपदाची जिम्मेदारी दिली तर वावगे ठरणार नाही.

उपलब्ध पर्यायांचा विचार करता कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ व रिषभ पंत पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: