आयपीएल २००८ चा विजेता राहिलेला राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्या सत्रात प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरला होता.२०२० च्या सत्रात स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानच्या संघाने सत्राच्या पहिल्या दोन सामन्यांत चैन्नई सुपर किंग व किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध शानदार विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने सत्राची धडाक्यात सुरुवात केली होती.पण त्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे राजस्थानला सलग ४ पराभवाला सामोरे जावे लागले होते.प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राजस्थान विजय आवश्यक होते पण शेवटी १२ गुणांसह राजस्थानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या (८ व्या) स्थानावर राहिला होता.
२०२० च्या सत्रात शेवटच्या स्थानावर राहिल्यानंतर जानेवारीमध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेपुर्वी राजस्थानने कर्णधार स्टिव स्मिथला बाहेरचा रस्ता दाखवला आहे आणि कर्णधारपदाची धुरा युवा यष्टिरक्षक फलंदाज संजु सॅमसनवर देण्यात आली आहे तसेच लिलाव प्रक्रियेत राजस्थानने ख्रिस मॉरिसला संघात सामील करत गोलंदाजी आणखीन मजबुत केली आहे. युवा कर्णधार सॅमसन कशाप्रकारे संघाचे नेतृत्व करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.संघाचा विचार करता कर्णधार संजु सॅमसन,जोस बटलर,बेन स्टोक्स,डेविड मिलरवर संघाच्या फलंदाजीची तर ख्रिस मॉरिस,श्रेयस गोपाल,कार्तिक त्यागी जिम्मेदारी,जयदेव उनाडकट व मयंक मार्कंडेवर संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी असेल.
२०२० च्या सत्रात राजस्थानकडुन संजु सॅमसनने सर्वाधिक ३७५ धावा केल्या होत्या तर अष्टपैलु राहुल तेवातियाने २५५ धावांसह राजस्थानसाठी सर्वाधिक १० बळी मिळवले होते.तश्याच कामगिरीची अपेक्षा या सत्रात देखिल दोन्ही खेळाडुंवर असेल.आपल्या पहिल्याच सत्रात सर्वांचे लक्ष्य वेधुन घेतलेल्या कार्तिक त्यागीवर देखिल सर्वांची नजर असेल.अष्टपैलु बेन स्टोक्स,शिवम दुबे, ख्रिस मॉरिस आणि राहुल तेवातिया संघाला मजबुत करत आहेत पण दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरने या सत्रातुन माघार घेतली आहे त्यामुळे संघाच्या गोलंदाजीची धुरा मॉरिसवर असेल.
सर्वोत्तम ११ – संजु सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट/मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी
राजस्थान रॉयल्स – संजु सॅमसन (कर्णधार), कुलदिप यादव, बेन स्टोक्स, य़शस्वी जैस्वाल, अनुज रावत, ख्रिस मॉरिस, अॅड्र्यु टाय, आकाश सिंग, कर्तिक त्यागी, जोफ्रा आर्चर (दुखापतीमुळे या सत्रातुन माघार), श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मयंक मार्कंडे, शिवम दुबे, के सी करीप्पा, महिपाल लोमरोर, मुस्तफिजुर रहमान, डेविड मिलर, लियम लिविंगस्टोन, जोस बटलर, मनन वोहरा, रियम पराग
सर्वोत्तम कामगिरी – २००८ (विजेतेपद)
आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान – ८
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply