तीन वेळेस विजेतेपद आणि ५ वेळेस उपविजेतेपद पटकावणारा चैन्नईचा आपले चौथे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने आयपीएल २०२० च्या आयपीएल मध्ये दाखला झाला होता आणि २०१९ चा विजेता मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चैन्नई संघाने सुरुवात केली होती.सुरेश रैना व हरभजन सिंगने काही कारणास्तव आयपीएलमधुन माघार घेतली होती त्यामुळे चैन्नईचा संघ काहीसा कमजोर वाटत होता.विजयी सुरुवातीनंतर तीन वेळच्या विजेता संघाला एक-एक विजयासाठी झगडावे लागले आणि १४ सामन्यांत १२ गुणांसह चैन्नई संघाला गुणतालिकेत ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चैन्नईचासंघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नव्हता.
सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत चैन्नईच्या फलंदाजीची जिम्मेदारी शेन वॉटसन, अंबाती रायडु, ड्यु प्लेसिसवर होती पण मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मात्र कोणताच फलंदाज संघाची जबाबदारी यशस्वीरित्या निभावु शकला नाही शेवटच्या काही सामन्यांत कर्णधार धोनीने ऋतुराज गायकवाडला स्थान दिले होते आणि मिळालेल्या संधीचा ऋतुराजने फायदा उठवत शानदार कामगिरी केली होती. आयपीएल २०२१ पुर्वी चैन्नई सुपर किंगने रॉबिन उथप्पा,मोईन अली, कृष्णप्पा गौतमला संघात सामावुन घेत फलंदाजी आणखी भक्कम केली आहे तर केदार जाधव व पियुष चावलाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच सुरेश रैना देखिल यासत्रात संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.आता रॉबिन उथप्पाला कोणत्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळते हे पाहावे लागेल.
चैन्नईकडुन फाफ ड्यु प्लेसिसने सर्वाधिक ४४९ धावा फटकावल्या होत्या तर सॅम करनने सर्वाधिक १३ गडी बाद केले होते.यासत्रात सुरेश रैना,फाफ ड्यु प्लेसिस,अंबाती रायडु व महेंद्रसिंग धोनी वर फलंदाजीची तर जोश हॅजेलवुडने यासत्रातुन माघार घेतल्याने दिपक चहर, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहीर, ड्वेन ब्राव्हो व लुंगी एन्गीडीवर गोलंदाजीची मदार असेल.चैन्नईने उथप्पाला आपल्या संघात तर सामील करुन घेतले आहे पण त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. आयपीएल २०२० च्या सत्रातील कामगिरी विसरुन चैन्नई सुपर किंगचा संघ आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात करण्यास उत्सुक असेल यांत शंका नाही.
सर्वोत्तम ११ – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडु, फाफ ड्यु प्लेसिस,मोईन अली, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/सॅम करन, शार्दुल ठाकुर, दिपक चहर, इम्रान ताहिर
चेन्नई सुपर किंग्स – महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडु, के एम आसिफ, ड्वेन ब्राव्हो, दिपक चहर, फाफ ड्यु प्लेसिस, इम्रान ताहिर, नारायण जगदिशन, जोश हॅजेलवुड (सत्रातुन माघार), कर्ण शर्मा, लुंगी एन्गीडी, मिशेल सॅंटनर, साई किशोरे, रविंद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम करन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरीशंकर रेड्डी, सी हरी निशांथ, भगत वर्मा
सर्वोत्तम कामगिरी – २०१०,२०११ आणि २०१८ (विजेतेपद)
आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान – ७
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply