महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरले

२ एप्रिल २०११,

तब्बल १५ वर्षांनंतर भारतीय उपखंडात विश्वचषक खेळवण्यात येत होता. १९८७ व १९९६ मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकापूर्वी एक- दीड वर्षातील भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघाकडे विजेतेपदाचा प्रमुख दावेदर म्हणून पाहिले जात होते त्यात भारतीय संघ मायदेशात खेळणार होता त्यामुळे संघाला प्रेक्षाकांचीही मोठ्या प्रमाणात मदत होणार होती.विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात बांग्लादेशचा धुव्वा उडवत भारतीय संघाने इतर संघाना इशारा दिला होता. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना टाय झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय आवश्यक होता. या सामन्यात युवराजने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावत विजयाचा पाया रचला होता आणि मग नंतर गोलंदाजांनी त्यावर विजयाचा कळस रचत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपुर्व सामन्यात मागील तीन वेळेसचा विश्वविजेता ऑस्टेलियाचा फडशा पाडत भारतीय संघाने विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकले. आता भारतीय संघ विजेतेपदापासुन दोन विजय दुर होता. भारताचा उपांत्या फेरीत सामना होता पाकिस्तानशी त्यात विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नव्हता त्यामुळे भारतीय संघाचेच पारडे जड होते. त्याचप्रमाणे भाराताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करत तीसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली तर दुसरीकडे श्रीलंकेनी न्युझिलंडचा ५ विकेटनी पराभव करत विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.

वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकापासुन झहीर खानने जोरदार मारा केला आणि थरंगा व दिलशानला त्याची गोलंदाजी खेळणे जमत नव्हते. श्रीलंकेनी १६.३ षटकात ६० धावांत २ बळी गमावले होते. त्यानंतर कर्णधार संगकारा व महेला जयवर्धनेनी ६२ धावांची भागिदारी करत संघाला स्थिरता मिळवून दिली होती. संगकारा बाद झाल्यानंतर जयवर्धनेनी एक बाजू सांभाळत थिलन समरविरा व नुआन कुलसेखरा सोबत महत्त्वाच्या भागिदाऱ्या करत जयवर्धनेनी ८८ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली होती तर शेवटी थिसरा परेरानी ९ चेंडूत २२ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २७४ पर्यंत नेऊन ठेवली. गोलंदाजीत युवराज सिंग व झहीर खानने २-२ बळी घेत महत्त्वाची भुमिका निभावली होती.

अंतिम सामन्यांत २७५ धावांचे आव्हान तसे मोठेच त्यात दुसऱ्याच चेंडूवर सेहवाग मलिंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला तर चांगली सुरुवात केल्यानंतर  सचिनसुद्धा १८ धावा काढुन तंबुत परतला होता. २ बाद ३१ अशी स्थिती झाल्यानंतर गंभीर व विराट कोहलीने सावध खेळ करत धावसंख्या पुढे नेत होते. २२ व्या षटकात दिलशानने स्वत:च्या गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल घेऊन विराट कोहलीला ३५ धावांवर बाद केले. अजुन भारताला विजयासाठी १६१ धावांची आवश्यकता होती. गौतम गंभीरचा चांगलाच जम बसला होता आणि कोहली बाद झाल्यानंतर विश्वचषकात अष्टपैलु कामगिरी करणारा युवराज सिंग फलंदाजीस येईल असेच सर्वांना वाटत होता पण कर्णधार धोनीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत स्वत: फलंदाजीस आला. धोनीने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली आणि गंभीर – धोनीचीच जोडी भारताला विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण गंभीर ९७ धावांवर असताना एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात थिसरा परेराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि फक्त ३ धावांनी त्याचे शतक हुकले. गंभीर बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५२ चेंडूत ५२ धावांची आवश्यकता होती. त्यात मैदानात होते सर्वोत्कृष्ट फिनीशरची भुमिका बजावणारे धोनी आणि युवराज सिंग. ४९ व्या षटकात नुआन कुलसेखराच्या गोलंदाजीवर धोनीने षटकार ठोकत भारताला विजय मिळवुन देत  संघाला तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकुन दिला. ७९ चेंडूत ९१ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या धोनीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले तर विश्वचषकात ३६२ धावा व १५ बळी अशी अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारताच्या विश्वचषक विजयात कर्णधार धोनी व युवराज सिंग बरोबरच सचिनने ४८२, गंभीरने ३९३, सेहवागने ३८० धावा तर झहीर खानने २१, मुनाफ पटेलने ११, हरभजन ९ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. जसा धोनीने षटकार ठोकला त्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने सर्व प्रेक्षकांना सुखद धक्का दिला होता. सचिन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ६ विश्वचषक खेळला त्यातील १९९६ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत आणि २००३ च्या विश्वचषकात तर भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या जवळ पोहचला होता पण त्यात संघाला पराभव स्विकारावा लागला आणि शेवटच्या विश्वचषकात त्याचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. विश्वचषक जिंकल्यानंतर जेव्हा सर्व भारतीय खेळाडुंनी सचिनला खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडिअमला मारलेली फेरी आजही आठवते. २००३ च्या विश्वचषकात भारताला विजेतेपदानी हुलकावणी दिली होती पण मायदेशात मिळवलेल्या विजयाने सर्व दुख: विसरुन गेले आणि भारतीय संघ विश्वविजेता बनला.  

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: