पंजाब किंग्स

१३ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पंजाब संघाने आतापर्यंत फक्त २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.२०२० च्या सत्रात के एल राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता तर दुसरीकडे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली होती.पहिल्याच सामन्यांत सुपर ओव्हर मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९७ धावांनी विजय मिळवत पंजाबचा संघ लयीत आला होता पण त्यानंतर पंजाबला सलग ५ पराभवाला सामोरे जावे लागले होते.प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पंजाबला प्रत्येक सामन्यांत विजय आवश्यक होता.सलग ५ पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने सलग ५ विजय मिळवत संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकुन ठेवले होते पण शेवटी त्यानां अपयश आले आणि १२ गुणांसह पंजाबला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

आयपीएल २०२१ मध्ये दाखल होण्यापुर्वी पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहेमान, शेल्डन कॉट्रेल, कृष्णप्पा गौतमला बाहेरचा रस्ता दाखवत मोईझेस हेनरिक्स, जाय रिचर्डसन, रिली मेरडीथ, शाहरुख खान, फेबियन एलन, डेविड मलानला संघात सामील करुन घेत फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणखीन भक्कम केली आहे. पंजाबच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार के एल राहुल, ख्रिस गेल, डेविड मलान आणि मयंक आगरवालवर तर गोलंदाजीची जबाबदारी जाय रिचर्डसन, रिली मेरडीथ, ख्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई व मुर्गन अश्विनवर असेल. मोईझेस हेनरिक्स आणि तामिलनाडुचा युवा अष्टपैलु खेळाडु शाहरुख खानला संघात सामील केल्याने पंजाबच्या संघात समतोल दिसत आहे.

मागील तीन सत्रात के एल राहुलने अनुक्रमे १९१२ धावा फटकावल्या आहेत त्यात २०२० च्या सत्रात राहुलने सर्वाधिक ६७० धावा फटकावल्या होत्या तश्याच कामगिरीची अपेक्षा यावेळेस पंजाब संघाला असेल तर गोलंदाजीत मोहम्मद शमीने पंजाबकडुन सर्वाधिक २० बळी बाद केले होते. २०२० च्या सत्रापर्य़ंत किंग्स इलेव्हन पंजाबने ओळखले जात असलेल्या संघाने आपल्या नावात बदल केला आहे आणि आता हा संघ “पंजाब किंग्स” नावाने ओळखला जाईल. आता नावात बदल केल्याने संघाच्या कामगिरीत सुधारणा होतो का हे पाहावे लागेल. पंजाब किंग्स आपल्या २०२१ च्या सत्राची सुरुवात १२ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने होणार आहे.

सर्वोत्तम ११- के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, डेविड मलान, निकोलस पुरन, मनदिप सिंग/दिपक हुड्डा, शाहरुख खान, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदिप सिंग/मुर्गन अश्विन, जाय रिचर्डसन, रवि बिश्नोई

पंजाब किंग्सके एल राहुल (कर्णधार), मोहम्मद शमी, निकोलस पुरन, ख्रिस गेल,मनदिप सिंग, मयंक आगरवाल, सरफराज खान, हरफ्रित ब्रार, मुर्गन अश्विन, इशान पोरेल,रवि बिश्नोई, ख्रिस जॉर्डन,दिपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, उत्कर्ष सिंग, मोईझेस हेनरिक्स, जाय रिचर्डसन, रिली मेरडीथ, अर्शदिप सिंग,दर्शन नालकंडे, शाहरुख खान, फेबियन एलन, डेविड मलान, सौरभ कुमार, जलज सक्सेना

सर्वोत्तम कामगिरी – २०१४ (उपविजेतेपद)

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: