कोलकत्ता नाईट रायडर्स

२०१२ व २०१४ च्या सत्राचा विजेता राहिलेल्या कोलकत्ता संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिकच्या खांद्यावर होते. २०२० च्या सत्रात मुंबईविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर कोलकत्ता संघाने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध शानदार विजय मिळवत सत्रातला पहिला विजय मिळवला होता.पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवत कोलकत्ताने चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि सत्राच्या मध्यात दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडचा मर्यादित षटकांतील कर्णधार इयॉन मॉर्गनकडे कोलकत्ता संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.मॉर्गनच्या नेतृत्त्वात कोलकत्ताचा संघ १४ गुणापर्यंत पोहचला होता पण सनरायझर्स हैद्राबाद व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पेक्षा कोलकत्ता नाईट रायडर्सचा नेट रनरेट कमी असल्याने कोलकत्ता संघाला ५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

आयपीएल २०२१ च्या पुर्वी झालेल्या लिलाव प्रक्रियेत दोन वेळचा विजेता कोलकत्ता नाईट रायडर्सने ख्रिस ग्रिन, सिद्धेश लाड, निखिल नाईक, एम सिद्धार्थ, टॉम बॅंटनला बाहेरचा रस्ता दाखवत शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, शेल्डन जॅक्सन व करुण नायरला संघात सामील करत फलंदाजीसोबतच गोलंदाजीतसुद्धा आपली ताकद वाढवली आहे. हरभजन सिंग व शाकिब अल हसनला सामील करत कोलकत्ता संघाची फिरकी गोलंदाजी आणखीन तगडी दिसते.मागच्या सत्रात कोलकत्ता संघाकडुन शुभमन गिलने सर्वाधिक ४४० धावा केल्या होत्या तर वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक १७ गडी बाद केले होते.आता शाकिब अल हसनच्या संघात येण्याने त्याला सुनिल नारायणच्या जागी संघात स्थान मिळते का हे पाहावे लागेल.

नव्या खेळाडुंच्या येण्याने कोलकत्ताचा संघ आणखीन मजबुत झाला आहे.कोलकत्ता संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल ती कर्णधार इयॉन मॉर्गन,दिनेश कार्तिक,शुभमन गिल,आंद्रे रसेल व नितीश राणावर तर गोलंदाजीची जबाबदारी पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, सुनिल नारायण, कुलदिप यादव व कमलेश नागरकोटीवर असेल.अष्टपैलु खेळाडुंचा भरणा असल्याने कोलकत्ताचा संघ कागदावर धोकादायक दिसतो आहे आता ते मैदानावर कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल.मागच्या सत्राच्या मध्यात कोलकत्ता संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इयॉन मॉर्गनवर संघाची मोठी जिम्मेदारी असेल. सलग दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेला कोलकत्ता संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक असतील.

सर्वोत्तम ११ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), सुनिल नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, कुलदिप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी/संदिप वॉरियर

कोलकत्ता नाईट रायडर्स – इयॉन मॉर्गन (कर्णधार), सुनिल नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, कुलदिप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी,संदिप वॉरियर, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, गुरकीरत सिंग मान, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, वैभव अरोरा, बेन कटिंग, टिम सेईफर्ट, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, वेंकटेश अय्यर, हरभजन सिंग, पवन नेगी

सर्वोत्तम कामगिरी – २०१२ व २०१४ विजेतेपद

आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान –

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: