आपले पहिले-वहिले विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता आणि बेंगलोर संघाने सनरायझर्सविरुद्ध विजय मिळवत त्यांनी तशी सुरुवात देखिल त्यांनी केली होती. बेंगलोरच्या संघाने कामगिरीत सातत्य राखत पहिल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत बेंगलोरचा संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता आणि बेंगलोरचा संघ पहिल्या दोन संघात आपले स्थान मिळवेल असेच वाटत होते पण साखळीतील शेवटच्या चार सामन्यांत बेंगलोरला पराभव स्विकारावा लागला पण रनरेट मध्ये बेंगलोरचा संघ कोलकत्ता संघापेक्षा वरचढ ठरल्याने बेंगलोरने १४ गुणांसह बेंगलोरने चौथे स्थान पटकावले होते. एलिमिनेटर मध्ये सनरायझर्स हैद्राबादकडुन पराभव झाल्याने बेंगलोरचा संघ आयपीएल २०२० बाहेर पडला होता.
आयपीएल २०२१ मध्ये दाखल होण्यापुर्वी बेंगलोर संघात अनेक नवीन खेळाडुंना संघात सामील करुन घेतले आहे.मागच्या सत्रात संघाचा भाग असलेल्या अॅरॉन फिंच, डेल स्टेन,ख्रिस मॉरिस,इसरु उदाना, मोईन अली व शिवम दुबे यांसारख्या तगड्या खेळाडुंना संघाबाहेर करत काईल जेमिसन (१५ करोड), केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल ख्रिश्चियन आणि ग्लेन मॅक्सवेल (१४.२५ करोड) यांसारख्या तगड्या आंतरराष्ट्रीय खेळाडुंना तर महम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी व रजत पटिदार यांसारख्या भारतीय खेळाडुंना संघात सामील करुन घेत बेंगलोरने आयपीएल २०२१ साठी आपला संघ उभारला आहे. काईल जेमिसन पहिल्यांदाच आयपीएलचा भाग आहे त्यामुळे तो आपल्या पहिल्या सत्रात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल तर मागच्या सत्रात सपशेल अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल कशी कामगिरी हे पाहावे लागेल.
२०२० च्या सत्रात आपले पहिले सत्र खेळणाऱ्या युवा देवदत्त पाडिकलने सर्वाधिक ४७३ धावा केल्या होत्या आणि विराट कोहली व एबी डीव्हीलियर्सने चांगली साथ दिली होती तर गोलंदाजीत यजुवेंद्र चहलने सर्वाधिक २१ बळी पटकावले होते. बेंगलोरच्या संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल ती कर्णधार विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल व देवदत्त पडिकलवर तर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल ती काईल जेमिसन, डॅनियल सॅम्स, यजुवेंद्र चहल, केन रिचर्डसनवर असेल. विराट कोहली सलामीला खेळणार असल्याने मधल्या फेळीत संघाचा डाव सांभाळण्याची डिव्हीलियर्स व मॅक्सवेलवर असेल.आपले पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने बेंगलोरचा संघ पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने आयपीएल २०२१ च्या सत्राची सुरुवात करणार आहे.
सर्वोत्तम ११ – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महम्मद अझरुद्दिन, डॅनियल ख्रिश्चियन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, केन रिचर्डसन/डॅनियल सॅम्स/काईल जेमिसन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- विराट कोहली (कर्णधार), ए बी डीव्हिलियर्स, यजुवेंद्र चहल, सुंदर, नवदिप सैनी, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिकल, शाहबाज अहमद, डॅनियल सॅम्स, फिन अॅलन, के एस भारत, काईल जेमिसन, डॅनियल ख्रिश्चियन, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, सचिन बेबी, पवन देशपांडे, हर्षल पटेल, अॅडम झंपा, केन रिचर्डसन, रजत पटिदार, महम्मद अझरुद्दीन
सर्वोत्तम कामगिरी – २००९,२०११ आणि २०१६ (उपविजेतेपद)
आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान – ४
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply