सनरायझर्स हैद्राबाद

२०१६ ते २०१९ दरम्यान चारही सत्रात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ एकमेव संघ होता आणि कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने सनरायझर्स हैद्राबादचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता. बेंगलोर व कोलकत्ता संघाविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर दोन सलग विजय मिळवत हैद्राबादचा संघ आपल्या नेहमीच्या लयीत आला असे वाटत होते पण पुढील ७ सामन्यांत त्यांना फक्ता २ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला होता.प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांत विजय आवश्यक होता त्यासोबतच त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष्य द्यावे लागणार होते. उर्वरित सामन्यांत हैद्राबाद संघाने विजय मिळवलाच त्यात शेवटच्या सामन्यांत मुंबईविरुद्ध १० गडी राखुन विजय मिळवत आपला रनरेट सुद्धा सुधारत १४ गुणांसह सनरायझर्स हैद्राबादने तीसरे स्थान पटकावले होते.एलिमिनेटर मध्ये बेंगलोरच्या पराभव केल्यानंतर क्वालिफायर-२ मध्ये त्यांना दिल्लीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आयपीएल २०२१ च्या लिलाव प्रक्रियेत फक्त मुजीब उर रहेमान, केदार जाधव, जगदिश सुचितला आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. तसेच करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मिशेल मार्शने आयपीएल २०२१ मधुन माघार घेतली आहे तर त्याच्या जागी हैद्राबादने जेसन रॉयला संघात सामावुन घेतले आहे.आयपीएल २०२० च्या सत्रात दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला स्पर्धेतुन माघार घेतली होती.सध्याचा जॉनी बेअरस्टो, भुवनेश्वर कुमारची सध्याची कामगिरी हि हैद्राबाद संघासाठी जमेची बाजू असेल.संघात चारच परदेशी खेळाडुंना संधी मिळत असल्याने वॉर्नर, बेअरस्टो, राशिद खान सोबत कोणच्या चौथ्या परदेशी खेळाडुला संधी मिळते हे पाहावे लागेल. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत जेसन होल्डरने शानदार कामगिरी केली होती त्याला अंतिम ११ मध्ये विल्यसनच्या जागी संधी मिळाली तर नवल वाटायला नको.

२०२० च्या सत्रात हैद्राबादकडुन कर्णधार डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५४८ धावा काढल्या त्याला मनिष पांडेने ४२५ धावा काढत चांगली साथ दिली होती तर राशिद खानने सर्वाधिक २० बळी पटकावले होते आणि त्यासोबतच टी नटराजन, संदिप शर्मा व जेसन होल्डरने आपले योगदान दिले होते. हैद्राबाद संघाच्या फलंदाजी मदार असेल ती कर्णधार डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यामसन, मनिष पांडेवर तर गोलंदाजीची मदार असेल ती भुवनेश्वर कुमार,राशिद खान,टी नटराजन व संदिप शर्मावर.मागील चार सत्रात पहिल्या चार क्रमांकात स्थान मिळवल्यानंतर हैद्राबादचा संघ विजेतेपदावर आपले नाव कोरता आले नाही.आता सनरायझर्स हैद्राबादचा संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने कोलकत्ता विरुद्धच्या सामन्यांने आपल्या सत्राची सुरुवात करणार हे मात्र नक्की.

सर्वोत्तम ११ – डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदिप शर्मा, टी नटराजन, शादाब नदिम

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर (कर्णधार), केन विल्यमसन, मनिष पांडे, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, शादाब नदिम,विजय शंकर, खलिल अहमद,संदिप शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान साहा, मोहम्मद नबी, श्रीवत्स गोस्वामी, अभिषेक शर्मा, विराट सिंग, टी नटराजन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, बासिल थंपी, मुजीब उर रहेमान, केदार जाधव, जेसन रॉय, जेसन होल्डर, जगदिश सुचित,

सर्वोत्तम कामगिरी – २०१६ (विजेतेपद)

आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान –

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: