दिल्ली कॅपिटल्स

२०१९ आणि २०२० सलग दोन सत्रात प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपदापर्यंत पोहचला होता पण २०२० च्या सत्रात मुंबई इंडियन्सकडुन पराभव स्विकारावा लागल्याने दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दिल्लीने सत्राची सुरुवात धडाक्यात करत पहिल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवत दिल्लीने आपले प्ले ऑफचे तिकीट पक्के केले असेच दिसत होते पण त्यानंतर झालेल्या सलग ४ पराभवामुळे दिल्लीच्या अडचणीत भर पडली होती आणि प्ले ऑफ मधील प्रवेशासाठी शेवटच्या सामन्यांत दिल्ली विजयाची आवश्यकता होती. बेंगलोरचा पराभव करत दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते. पहिल्या क्वालिफायर मध्ये मुंबईकडुन पराभव झाल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायर मध्ये हैद्राबादचा पराभव करत दिल्लीचा संघ आपल्या पहिल्या वहिल्या अंतिम सामन्यांत दाखल झाला होता पण पुन्हा एकदा मुंबईकडुन त्यांना पराभव स्विकारावा लागला आणि दिल्लीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

२०२१ च्या लिलाव प्रक्रियेपुर्वी दिल्ली संघाने किमो पॉल, संदिप लामिछाने, मोहित शर्मा, अॅलेक्स कॅरी यांना बाहेरचा रस्ता दाखवत स्टिव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, विष्णु विनोद, टॉम करन, लुकमान मेरीवाला यांना संघात स्थान दिले आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिके दरम्यान खांद्याला दुखापत झाल्याने दिल्लीला श्रेयस अय्यरची कमी नक्कीच जाणवेल यात काही शंका नाही.तसेच स्मिथ, वोक्स, बिलिंग्सच्या येण्याने दिल्लीच्या संघाचा समतोल चांगला दिसतो.आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा भरणा असलेल्या या संघात देशांतर्गत स्पर्धांत शानदार कामगिरी केलेल्या विष्णु विनोद, मेरीवाला यांसारख्या खेळाडुंना संघात स्थान दिले आहे आता त्यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळते का हे पाहावे लागेल.

मागच्या सत्रात शानदार कामगिरी केलेल्या शिखर धवन, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्खिया, रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉयनिसकडुन कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा असेल तर दुसरीकडे मागच्या सत्रात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ कडुन शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्हन स्मिथ, रिषभ पंत व मार्कस स्टॉयनिसवर तर गोलंदाजीची जबाबदारी रबाडा, नॉर्खिया, अश्विन, अक्षर पटेल व इशांतवर असेल. आता अय्यरच्या जागी संघात स्मिथला स्थान भेटते का हे पाहावे लागेल. तसेच यावेळेस आयपीएल भारतात होत असल्याने फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहु शकतो त्याप्रमाणे दिल्लीकडे अक्षर, मिश्रा व अश्विनसारखे तगडे गोलंदाज आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघात फिनिशरची भुमिका कोण सांभाळतो हे पाहावे लागेल.श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी पडलेला युवा रिषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांची नजर असेल.

सर्वोत्तम ११ –  रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, विष्णु विनोद, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, इशांत शर्मा, एन्रिक नॉर्खिया

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, अवेश खान, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, , सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, स्टिव्ह स्मिथ, एम सिद्धार्थ, विष्णु विनोद, रिपल पटेल, प्रविण दुबे, एन्रिक नॉर्खिया, उमेश यादव, लुकमान मेरीवाला, टॉम करन, श्रेयस अय्यर (दुखापतीमुळे सत्रातुन माघार)

सर्वोत्तम कामगिरी – २०२० (उपविजेतेपद)

आयपीएल २०२० मध्ये गुणतालिकेतील स्थान –

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: