२०१९ च्या सत्रात आपले चौथे आपपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियनंसचा संघ २०२० च्या सत्रात दाखल झाला होता.महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल २०२० चे सत्र संयुक्त अरब अमिरात मध्ये खेळविण्यात येत होती आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये मुंबई संघाची कामगिरी निराशजनक राहिली आहे त्यामुळे मुंबईचा संघ संयुक्त अरब अमिरात मधील आपली कामगिरी सुधारण्यास उत्सुक होता. पहिल्या सामन्यांत चैन्नईकडुन पराभव झाल्यानंतर कोलकत्ताविरुद्ध शानदार विजय मिळवत मुंबईने संयुक्त अरब अमिरात मध्ये पहिला वहिला विजय मिळवला होता. त्यानंतर पुढच्याच सामन्यांत मुंबईला बेंगलोर विरुद्ध सुपर ओव्हर मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. ३ सामन्यांत फक्त १ विजय मिळवल्यानंतर मुंबईने सलग ५ सामन्यांत विजय मिळवल्यानंतर संघाने शानदार कामगिरी करत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले होते. क्वालिफायर-१ मध्ये दिल्लीचा पराभव करत मुंबईचा संघ सलग दुसऱ्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवला होता. क्वालिफायर-१ प्रमाणेच अंतिम सामन्यांत दिल्लीचा ५ गडी राखुन पराभव करत सलग दुसरे विजेतेपदावर आपले नाव कोरले.
२०२१ च्या लिलाव प्रक्रियेत ५ वेळेचा विजेता मुंबई संघाने मिशेल मॅक्लेनाघन,शेर्फन रुदरफोर्ड, दिग्विजय देशमुखला मुक्त केले होते तर त्यांच्या जागी मुंबईने जिमि निशम, अॅडम मिल्ने, पियुष चावला यांसारख्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडुंना संघात सामील केले आहे तर मार्को जेनसेन आणि अर्जुन तेंडुलकरला या युवा खेळाडुंना सुद्धा मुंबईने आपल्या ताफ्यात घेतले आहे. अॅडम मिल्ने, पियुष चावलाच्या येण्याने मुंबईची गोलंदाजीत तागद वाढवली आहे. अर्जुन तेंडुलकरने यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली चषकात मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते पण त्यात अर्जुन तेंडुलकरला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सकडुन खेळण्याची संधी मिळते का हे पाहावे लागेल.
आयपीएल २०२० च्या मुंबईकडुन इशान किशनने सर्वाधिक ५१६ धावा केल्या होत्या आणि त्याला क्विंटन डी कॉक (५०३) व सुर्यकुमार यादव (४८०) ने चांगली साथ दिली होती तर गोलंदाजीत जसप्रित बुमहारने सर्वाधिक २७ तर ट्रेंट बोल्टने २५ गडी बाद केले होते. आयपीएल २०२० च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास मुंबई इंडियन्सचे खेळाडु उत्सुक असतील यांत शंका नाही. कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड व हार्दिक पंड्यावर फलंदाजीची तर जसप्रित बुमराह,ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, नॅथन कुल्टर नील, पियुष चावला व राहुल चहरवर गोलंदाजीची जिम्मेदारी असेल. मुंबईला २०२१ चे सत्र जिंकुन सलग तीसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे आता २०२१ च्या सत्राची मुंबईचा संघ कशी सुरुवात करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.
सर्वोत्तम ११ – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर/पियुष चावला, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल/ अॅडम मिल्ने
संघ- रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, ख्रिस लिन, इशान किशन, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल,राहुल चहर,धवल कुलकर्णी, अनमोलप्रित सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकुल रॉय, सौरभ तिवारी, मोहसिन खान, अॅडम मिल्ने, पियुष चावला, जिमी नेशम, युधिविर चरक, मार्को जेनसेन, अर्जुन तेंडुलकर
सर्वात्तम कामगिरी- २०१३,२०१५,२०१७,२०१९ व २०२० विजेतेपद
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply