आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचे आव्हान

करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त अरब अमिराती मध्ये खेळविण्यात आलेल्या आयपीएल २०२० नंतर आज चैन्नई मध्ये मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सामन्यांने आयपीएल २०२१ चा बिगुल वाजणार आहे. करोना विषाणु मुळे यावेळेस स्पर्धा मर्यादित ठिकाणी खेळविण्यात येत आहे त्यात मुंबई, चेन्नई, बेंगलोर, कोलकत्ता, दिल्ली व अहमदाबादचा समावेश आहे तर प्ले ऑफचे सामने अहमदाबाद मधील भव्य नरेंद्र मोदी मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.मुंबईचा संघ मागील दोन सत्राचा विजेता राहिला आहे तर बेंगलोरचा संघ आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.मुंबईचा संघ विजेतेपदाची हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने सत्राची सुरुवात करताना दिसेल तर ३ वेळेस उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेला बेंगलोरचा संघ विजेते पदावर नाव कोरण्यास आतुर असेल हे मात्र नक्की.

मुंबई संघाचा विचार करता आयपीएल २०२० मधील संघच मैदानावर खेळताना दिसु शकतो. पण चेन्नईची खेळपट्टी फिरकीस अनुकुल असते त्यामुळे संघात नव्याने संघात आलेल्या पियुष चावलाला अंतिम ११ मध्ये संधी मिळु शकते. तसेच चावलाच्या जोडीला कृणाल पंड्या आणि जयंत यादव सुद्धा अंतिम संघात दिसु शकतात.जलदगती गोलंदाजीची जबाबदारी असेल ती जसप्रित बुमराह व ट्रेंट बोल्टवर. आयपीएल २०२० मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास दोघेही उत्सुक असतील.फलंदाजीचा विचार करता पहिल्या एक-दोन सामन्यांत क्विंटन डी कॉक उपलब्ध नसल्याने कर्णधार रोहित शर्मासोबत ख्रिस लीन सलामीला दिसु शकतो तर मधल्या फळीची जबाबदारी असेल ती सुर्यकुमार यादव,इशान किशन, हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्डवर. मागील ९ सत्रात मुंबई संघाला पहिल्या सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या सामन्यांत विजय मिळवुन सत्राची शानदार सुरुवात करण्यास मुंबईचा संघ आतुर असेल.

मागच्या सत्रात एका चांगल्या सुरुवातीनंतर बेंगलोर संघाला प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर नजर ठेवावी लागली होती त्यामुळे विराटच्या नेतृत्वातील बेंगलोरचा संघ ५ वेळचा विजेता मुंबईवर विजय मिळवुन सत्राची शानदार सुरुवात करण्यास उत्सुक असेल. यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि अॅडम झंपा सारखे फिरकीपटु बेंगलोरसाठी महत्ताचे असणार आहेत. तसेच यावेळस संघात सामील झालेला ग्लेन मॅक्सवेलची फिरकी गोलंदाजी बेंगलोरसाठी चेन्नईच्या खेळपट्टीवर उपयुक्त ठरु शकते.जलदगती गोलंदाजीची धुरा असेल ती काईन जेमिसन, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसनवर. बेंगलोरच्या फलंदाजीची धुरा असेल ती कर्णधार विराट कोहली, ए बी डिव्हीलीयर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि मागच्या सत्रात शानदार कामगिरी केलेल्या देवदत्त पाडिकलवर परंतु सुरुवातीच्या काही सामन्यांत काही कारणास्तव पाडिकल खेळणार नाही त्यामुळे विराटसोबत रजत पटिदार खेळताना दिसु शकतो. आयपीएलचा इतिहास पाहिला तर मुंबई २९ सामन्यांपैकी १९ सामन्यांत तर बेंगलोरने १० सामन्यांत विजय मिळवला आहे त्यामुळे कोण-कोणावर भारी पडतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य असेल.

संभावीत संघ-

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सुर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), रजत पटिदार, ए बी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महम्मद अझरुद्दिन, डॅनियल ख्रिश्चियन, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, काईल जेमिसन

ड्रीम संघ – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), सुर्यकुमार यादव, इशान किशन, एबी डीव्हीलियर्स, हार्दिक पंड्या, डॅनियल ख्रिश्चियन, यजुवेंद्र चहल, राहुल चहर, जसप्रित बुमराह, नॅथन कुल्टर नाईल

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: