स्टुअर्ट ब्रॉड ५०० नाबाद

स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजीचा कणा. स्टुअर्ट ब्रॉडचा जन्म १९८६ मध्ये नॉंटिंगहॅम मध्ये इंग्लंडचा फलंदाज ख्रिस ब्रॉडच्या घरात झाला होता. महत्त्वाचे म्हणजे स्टुअर्टच्या वडिलांनी देखील १९८४ ते १९८९ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ते सध्या सामनाधीकारीची भुमिका निभावत आहेत.  स्टुअर्ट ब्रॉडने २००५ मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती आणि... Continue Reading →

कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर

कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात. सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये... Continue Reading →

कपिल देवची नाबाद १७५ धावांची ऐतिहासीक खेळी

१८ जून १९८३ म्हणजे तब्बल ३७ वर्षापुर्वी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार कपिल देवने डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडूत नाबाद १७५ दैदिप्यमान खेळी केली होती. १९७५ व १९७९ या पहिल्या दोन विश्वचषकात निराशाजनक कामगिरी राहिलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव करत केली होती. वेस्ट... Continue Reading →

भारतीय संघ जर एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने खेळत असेल तर भारताचे कसोटी व टी-२० संघ कसे असतील?

वर्षातले १२ महिने जगातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात क्रिकेट स्पर्धा सुरुच असतात आणि असा कोणताही महिना नसतो ज्यात एकही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मागिल तीन महिन्यांपासुन कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली गेली नाही. मागील महिन्यांत वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन टी-१० स्पर्धा खेळविण्यात आली तर आजपासुन ऑस्ट्रेलियाच्या डार्विन मध्ये टी-२० स्पर्धा खेळविण्यात... Continue Reading →

इंग्लंडचा संघ जर एकाच दिवशी टी-२० व कसोटी सामना खेळत असेल तर संघ कसे असतील?

कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धांवर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळण्याची शक्यता असु शकते पण हे असे होईलच असे नाही पण असे झाले तर त्यांचे संघ कसे असतील. समजा इंग्लंडचा संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतो तर दुसरीकडे... Continue Reading →

६ ते ८ जून दरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवली जाणार ऑस्ट्रेलियात टी-२० स्पर्धा

जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत काही देशातील फुटबॉल सामने व कॅरेबियन मधील टी-१० स्पर्धा सोडल्यास कोणतीही मोठी स्पर्धा खेळविण्यात आली नव्हती. त्यातच आता ह्या आठवड्याच्या शेवटी महाराणीच्या वाढदिवसानिमित्त डार्विन येथे टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट हळुहळु पुर्वपदावर येण्यास मदत होईल हे मात्र नक्की. Cricket will resume in the Northern Territory this weekend!... Continue Reading →

इंग्लंडविरुदधच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, डॅरेन ब्राव्हो, हेटमायरची माघार तर युवा केमर होल्डरला संधी

मार्च मध्ये ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाही त्यात काही देशांमध्ये प्रेक्षकांशिवाय फुटबॉल सामने व वेस्ट इंडीजमध्ये कॅरबियन टी-१० लीग खेळविण्यात आली होती. तसेच इंग्लंडने खेळाडुंना वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सरावासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रेक्षकांशिवाय होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांची... Continue Reading →

महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी सलामी, फिरकीपटु पुनम यादव ठरली सामनावीर

       आजपासुन ऑस्ट्रेलियात सुरु झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सामना होता तो चार वेळेसचा टी-२० विश्वचषक विजेता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध. नुकत्याच झालेल्या तीरंगी टी-२० मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता पण अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ११ धावांनी पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे हा सामना शानदार होणार यात... Continue Reading →

दर्जेदार गोलंदाजांसमोर लागेल फलंदाजांचा कस

         न्युझिलंड दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवल्यानंतर यजमान न्युझिलंडने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. टी-२० मालिकेतील शानदार कामगिरीनंतर एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन भारतीय संघ कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या... Continue Reading →

आयपीएल २०२०: कोणाला लागणार लॉटरी?

              २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आयपीएल २०२० महत्वाची असणार आहे. आयपीएल २०२० ची तयारी म्हणून सर्व संघांनी ट्रेडिंग विंडो मधून आपल्या संघात काही खेळाडूंना सामावून घेतले तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बाहेरचा रस्ता दाखवलेल्या खेळाडूंत दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत कोणत्या खेळाडूंची लॉटरी लागते हे... Continue Reading →

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासुन चैन्नईत सुरुवात

     टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे तर दुसरीकडे टी-२० मालिकेतील पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय मालिकेत आणखी त्वेषाने मैदानात उतरणार यात काही शंका नाही. भारताविरुद्धच्या मालिकेपुर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वेस्ट इंडिजने ३-० ने विजय मिळवला होता त्यामुळे त्याचा फायदा त्यांना या मालिकेत होऊ शकतो. मागिल काही वर्षांतील वेस्ट इंडिजची मोठ्या... Continue Reading →

माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक

      १९९७-२०१२ या १५ वर्षांत १४७ कसोटी, २९५ एकदिवसीय व २५ टी-२० सामने यांत अनुक्रमे ५५१५, ४६८६ व २६८ धावा यासोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दित यष्टिमागे ९९९ बळी असा भरभक्कम अनुभव असलेल्या माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची २०२३ च्या विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी केली आहे.       भारत दौऱ्यावर... Continue Reading →

अजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५

              भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव ढेपाळला होता. अष्टपैलु खेळाडु रोस्टन चेस (४८) व शिमरॉन हेटमायर (३५) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नव्हता आणि दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ८ बाद १८९ झाली होती. वेस्ट इंडिजचा संघ अजुनही १०८ धावांनी पिछाडीवर होता आणि ही पिछाडी कमी करण्याची... Continue Reading →

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे विश्वचषकाचा प्रबळ दावेदार इंग्लंडच्या अडचणीत वाढ

            पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या इंग्लंडने त्यानंतर बांग्लादेश, वेस्ट इंडिज व अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवले आणि इंग्लंडचा संघ चांगल्या लयीत दिसत होता त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांत इंग्लंडचा संघच वरचढ दिसत होता. तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी श्रीलंकेसाठी विजय आवश्यक होता पण मागील काही वर्षांतील श्रीलंकेची कामगिरी पाहता एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इंग्लंडविरुद्ध... Continue Reading →

भारतीय फलंदाजांसमोर पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आव्हान

           ३० मे पासुन विश्वचषक २०१९ ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे पण क्रिकेट रसिकांच लक्ष्य लागुन राहिलं आहे ते म्हणजे भारत व पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्ध्यांत मॅंचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यांकडे. दोन विजय व एक सामना रद्द झाल्याने भारताकडे ५ गुण आहेत तर एक विजय, दोन पराभव व एक सामना रद्द झाल्याने पाकिस्तानकडे ३ गुण आहेत. २०१९... Continue Reading →

बांग्लादेशचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, अष्टपैलु शाकिब ठरला सामनावीर

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यांत यजमान इंग्लंडकडुन १०७ धावांनी पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी लयीत येण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे बांग्लादेश आपला पहिला सामना खेळत होता. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत जलदगती गोलंदाजांचा वरचष्म राहिला होता त्यामुळे बांग्लादेशच्या फलंदाजांसमोर आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांचे आव्हान होते. आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आफ्रिकेनी... Continue Reading →

हेनरी व फर्ग्युसनच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज ढेर, न्युझिलंडचा १० गड्यांनी विजय

पहिले दोन सामने एकतर्फी झाल्यानंतर न्युझिलंड व श्रीलंकेतला सामना कसा होतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य होते. श्रीलंकेचा नवनिर्वाचित कर्णधार दिमुथ करुणारत्ने संघाचे नेतृत्व कसे करतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कालच्या सामन्यांत वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती त्यामुळे श्रीलंकेच्या युवा फलंदाजांसमोर ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी व लॉकी सॅंटनरचे आव्हान... Continue Reading →

आयपीएल १२ च्या पहिल्याच सामन्यांत बेंगलोरसमोर चेन्नईचे आव्हान

         २०१९ च्या लोकसभा निवडणुकां आणि २०१९ च्या विश्वचषक लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा नेहमीपेक्षा लवकर सुरु होणार आहे. २०१९ च्या आयपीएल सत्राची सुरुवात आजपासुन चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. पहिल्याच सामन्यांत बेंगलोरसमोर आव्हान असेल ते म्हणजे तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंगचे. दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतलेल्या चेन्नई सुपर किंगच्या संघाने २०१८ मध्ये... Continue Reading →

आर्यलॅंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यांत अफगाणिस्ताननी ७ गड्यांनी विजय मिळवत नोंदवला पहिला कसोटी विजय

      २०१८ मध्ये अफगाणिस्ताने भारताविरुद्ध तर आर्यलॅंडने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला कसोटीत पदार्पण केले. दोन्ही संघ आपला दुसरा कसोटी सामना तब्बल ८ - ९ महिन्यांनंतर  देहराडुनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळणार होते. या सामन्यांआधी  अफगाणिस्ताने टी-२० मालिका ३-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पहिल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांना पराभव स्विकारावा... Continue Reading →

मयंक आगरवाल व रोहन कदमच्या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकची पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषकाच्या विजेतेपदाला गवसणी

संपुर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला कर्नाटकचा संघ आणि स्पर्धेत फक्त एका सामन्यांत पराभव स्विकाराव्या लागलेल्या महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत धडक मारली होती. कर्नाटकने सुपर लिगमध्ये मुंबई, विदर्भ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा तर महाराष्ट्रने बंगाल, झारखंड, गुजरात आणि रेल्वेचा पराभव केला. कर्नाटकचा कर्णधार मनिष पांडेनी नाणेफेक जिंकत महाराष्ट्राच्या संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कर्नाटकच्या संघात कर्णधार... Continue Reading →

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: