पाकिस्तान मालिकेचा शेवट गोड करणार की इंग्लंड मालिका खिशात घालणार ?

पहिला सामन्यांत पावसामुळे फक्त १६.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यांत यजमान इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानची सलामी जोडी फखर जमान व कर्णधार बाबर आझमने संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. फखर व बाबरच्या भागिदारीनंतर अनुभवी मोहम्मद हफीजने ३६ चेंडूत ४ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने ६९ धावांची खेळी करत... Continue Reading →

इंग्लंडविरुद्धच्या टी२० व एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

वेस्ट इंडिज, आर्यलॅंड, पाकिस्तान पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-२० सामने अनुक्रमे ४,६ व ८ सप्टेंबरला ओल्ट ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर येथे तर एकदिवसीय सामने ११, १३ व १६ सप्टेंबरला एग्ज बॉउल,हॅम्पशेअर येथे खेळविण्यात येणार... Continue Reading →

पाकिस्तान बरोबरी साधणार की इंग्लंड घेणार मालिकेत विजयी आघाडी?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल चार महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ आर्यलॅंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला.त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मॅंचेस्टर येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांत यजमान इंग्लंडने तीन गडी राखुन विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यांत नाणेफेक... Continue Reading →

स्टुअर्ट ब्रॉड ५०० नाबाद

स्टुअर्ट ख्रिस ब्रॉड इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजीचा कणा. स्टुअर्ट ब्रॉडचा जन्म १९८६ मध्ये नॉंटिंगहॅम मध्ये इंग्लंडचा फलंदाज ख्रिस ब्रॉडच्या घरात झाला होता. महत्त्वाचे म्हणजे स्टुअर्टच्या वडिलांनी देखील १९८४ ते १९८९ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ते सध्या सामनाधीकारीची भुमिका निभावत आहेत.  स्टुअर्ट ब्रॉडने २००५ मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती आणि... Continue Reading →

कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर

कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात. सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये... Continue Reading →

१९८३ विश्वचषक अंतिम सामना: एक ऐतिहासिक विजय

१९७५ व १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या दोन विश्वचषकात भारतीय संघाला नवोदित ईस्ट आफ्रिका संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला होता. पहिल्या दोन्ही विश्वचषकावर क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले नाव कोरले होते महत्त्वाचे म्हणजे सलग तीसरी विश्वचषक स्पर्धाही इंग्लंडमध्येच खेळविण्यात येत होती. सलग तिसरे विश्वविजेतेपद मिळवण्याच्या जिद्दीने वेस्ट इंडिजचा संघ तर भारतीय... Continue Reading →

कपिल देवची नाबाद १७५ धावांची ऐतिहासीक खेळी

१८ जून १९८३ म्हणजे तब्बल ३७ वर्षापुर्वी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार कपिल देवने डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडूत नाबाद १७५ दैदिप्यमान खेळी केली होती. १९७५ व १९७९ या पहिल्या दोन विश्वचषकात निराशाजनक कामगिरी राहिलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव करत केली होती. वेस्ट... Continue Reading →

भारतीय संघ जर एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने खेळत असेल तर भारताचे कसोटी व टी-२० संघ कसे असतील?

वर्षातले १२ महिने जगातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात क्रिकेट स्पर्धा सुरुच असतात आणि असा कोणताही महिना नसतो ज्यात एकही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मागिल तीन महिन्यांपासुन कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली गेली नाही. मागील महिन्यांत वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन टी-१० स्पर्धा खेळविण्यात आली तर आजपासुन ऑस्ट्रेलियाच्या डार्विन मध्ये टी-२० स्पर्धा खेळविण्यात... Continue Reading →

इंग्लंडचा संघ जर एकाच दिवशी टी-२० व कसोटी सामना खेळत असेल तर संघ कसे असतील?

कारोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धांवर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळण्याची शक्यता असु शकते पण हे असे होईलच असे नाही पण असे झाले तर त्यांचे संघ कसे असतील. समजा इंग्लंडचा संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतो तर दुसरीकडे... Continue Reading →

६ ते ८ जून दरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवली जाणार ऑस्ट्रेलियात टी-२० स्पर्धा

जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत काही देशातील फुटबॉल सामने व कॅरेबियन मधील टी-१० स्पर्धा सोडल्यास कोणतीही मोठी स्पर्धा खेळविण्यात आली नव्हती. त्यातच आता ह्या आठवड्याच्या शेवटी महाराणीच्या वाढदिवसानिमित्त डार्विन येथे टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट हळुहळु पुर्वपदावर येण्यास मदत होईल हे मात्र नक्की. Cricket will resume in the Northern Territory this weekend!... Continue Reading →

महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी सलामी, फिरकीपटु पुनम यादव ठरली सामनावीर

       आजपासुन ऑस्ट्रेलियात सुरु झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सामना होता तो चार वेळेसचा टी-२० विश्वचषक विजेता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध. नुकत्याच झालेल्या तीरंगी टी-२० मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता पण अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ११ धावांनी पराभव करत मालिकेवर आपला कब्जा केला होता. त्यामुळे हा सामना शानदार होणार यात... Continue Reading →

दर्जेदार गोलंदाजांसमोर लागेल फलंदाजांचा कस

         न्युझिलंड दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिकेत ५-० ने विजय मिळवल्यानंतर यजमान न्युझिलंडने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. टी-२० मालिकेतील शानदार कामगिरीनंतर एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन भारतीय संघ कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या... Continue Reading →

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासुन चैन्नईत सुरुवात

     टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे तर दुसरीकडे टी-२० मालिकेतील पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय मालिकेत आणखी त्वेषाने मैदानात उतरणार यात काही शंका नाही. भारताविरुद्धच्या मालिकेपुर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वेस्ट इंडिजने ३-० ने विजय मिळवला होता त्यामुळे त्याचा फायदा त्यांना या मालिकेत होऊ शकतो. मागिल काही वर्षांतील वेस्ट इंडिजची मोठ्या... Continue Reading →

माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक

      १९९७-२०१२ या १५ वर्षांत १४७ कसोटी, २९५ एकदिवसीय व २५ टी-२० सामने यांत अनुक्रमे ५५१५, ४६८६ व २६८ धावा यासोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दित यष्टिमागे ९९९ बळी असा भरभक्कम अनुभव असलेल्या माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची २०२३ च्या विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी केली आहे.       भारत दौऱ्यावर... Continue Reading →

अजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५

              भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव ढेपाळला होता. अष्टपैलु खेळाडु रोस्टन चेस (४८) व शिमरॉन हेटमायर (३५) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नव्हता आणि दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ८ बाद १८९ झाली होती. वेस्ट इंडिजचा संघ अजुनही १०८ धावांनी पिछाडीवर होता आणि ही पिछाडी कमी करण्याची... Continue Reading →

भारतीय फलंदाजांसमोर पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आव्हान

           ३० मे पासुन विश्वचषक २०१९ ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे पण क्रिकेट रसिकांच लक्ष्य लागुन राहिलं आहे ते म्हणजे भारत व पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्ध्यांत मॅंचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यांकडे. दोन विजय व एक सामना रद्द झाल्याने भारताकडे ५ गुण आहेत तर एक विजय, दोन पराभव व एक सामना रद्द झाल्याने पाकिस्तानकडे ३ गुण आहेत. २०१९... Continue Reading →

हेनरी व फर्ग्युसनच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज ढेर, न्युझिलंडचा १० गड्यांनी विजय

पहिले दोन सामने एकतर्फी झाल्यानंतर न्युझिलंड व श्रीलंकेतला सामना कसा होतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष्य होते. श्रीलंकेचा नवनिर्वाचित कर्णधार दिमुथ करुणारत्ने संघाचे नेतृत्व कसे करतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कालच्या सामन्यांत वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती त्यामुळे श्रीलंकेच्या युवा फलंदाजांसमोर ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी व लॉकी सॅंटनरचे आव्हान... Continue Reading →

दुसऱ्या कसोटीत १० गड्यांनी विजय मिळवत भारताने २-० ने मालिका खिशात घातली, पृश्वी शॉ ठरला मालिकावीर

पहिल्या कसोटीत १ डाव आणि २७२ धावांनी पराभव स्विकारल्यानंतर हैद्राबाद येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजने पॉल व लेविसच्या जागी जेसन होल्डर व वॉरिकनचा समावेश केला होता तर भारतीय संघाने मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकुरचा समावेश केला होता.  पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या... Continue Reading →

अटीतटीच्या सामन्यात भारताने ३ गड्यांनी विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले

श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्धिंचा तसेच अफगानिस्तानचा पराभव करत बांग्लादेशने अंतिम सामन्यांत धडक मारली होती. आता त्यांचा सामना होता तो भारतीय संघाशी. अफगानिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने तर बांग्लादेशचा संघ पहिल्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्याच्या विजेतेपदक... Continue Reading →

Fakhar Zaman’s 91 help Pakistan to seal the ninth successive T20I series win

Top two teams of the T20I ranking were playing against each other in the final of the T20 tri-series in Zimbabwe. Both Australia and Pakistan won 3 matches and lost 1 match each. Out of these two teams, Australia was looking more balanced side as compare to Pakistan. Aaron Finch and Fakhar Zaman were the... Continue Reading →

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: